शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

उत्तर प्रदेशात आघाडीसाठी दरवाजे बंद केले नाहीत; सरचिटणीस प्रियांका गांधींचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 09:13 IST

भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितले.

लखनऊ :उत्तर प्रदेशमध्ये इतर पक्षांशी युती करण्याचे दरवाजे आम्ही बंद केलेले नाहीत. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष दुर्बल होईल असा कोणताही निर्णय आम्ही घेणार नाही. मात्र, कोणाशी युती करणार किंवा नाही याबद्दल इतक्या लवकर काही सांगणे योग्य होणार नाही. भाजपला पराभूत करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आगामी काळातील स्थिती पाहूनच काँग्रेस आपली रणनीती ठरविणार आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षांच्या काळात काँग्रेसने उत्तर प्रदेशात खूप मेहनत घेऊन काम केले आहे. ग्रामपंचायतींच्या स्तरापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे विणले आहे. त्यामुळे काँग्रेस आता संपूर्ण ताकदीने निवडणुका लढवेल. 

प्रियांका गांधी या राजकीय पर्यटक आहेत अशी टीका भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. त्याबद्दल प्रियांका गांधी म्हणाल्या की, मी उत्तर प्रदेशला वारंवार भेटी देत असते. मी व माझा भाऊ राहुल गांधी फारशा गांभीर्याने राजकारण करत नाही असा गैरसमज भाजप पसरवत असतो. मात्र, त्याकडे आम्ही अजिबात लक्ष देणार नाही. मी उत्तर प्रदेशकडे दुर्लक्ष करते असा खोडसाळ प्रचार भाजपकडून केला जातो. मात्र, गेल्या १८ महिन्यांत प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नावर काँग्रेसने आवाज उठविला आहे, हे नागरिकांना दिसून येईल.

भीती दूर करा 

प्रियांका गांधी यांनी शनिवारी सांगितले की, काँग्रेस कार्यकर्त्यांना मनातले भय बाजूला सारून २०२२ साली होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज व्हावे. त्यासाठी अहोरात्र काम करावे. नागरिकांच्या प्रश्नांवर २०१९ पासून काँग्रेसने रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे याची आठवणही त्यांनी करून दिली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधी