प्रियंका गांधी प्रचारापासून दूर का?

By Admin | Updated: February 25, 2017 00:24 IST2017-02-25T00:24:10+5:302017-02-25T00:24:10+5:30

उत्तर प्रदेशात काँग्रेस - समाजवादी पार्टी यांची आघाडी होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी प्रचारापासून मात्र दूर दिसत आहेत.

Priyanka Gandhi is away from the campaign? | प्रियंका गांधी प्रचारापासून दूर का?

प्रियंका गांधी प्रचारापासून दूर का?

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात काँग्रेस - समाजवादी पार्टी यांची आघाडी होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी प्रचारापासून मात्र दूर दिसत आहेत.
काँग्रेसचा गड असलेल्या रायबरेलीतही गत आठवड्यात झालेल्या निवडणूक रॅलीत प्रियंका गांधी दिसल्या नाहीत. या दोन लोकसभा मतदारसंघातील आणि शेजारच्या मतदारसंघांतील कार्यकर्ते आणि उमेदवार यांनाही अपेक्षा होती की, प्रियंका गांधी येथे प्रचारासाठी येतील. परंतू, त्या येथे आल्या नाहीत.
उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी या निवडणुकीच्या काळात सक्रीय नसल्याचे कारण वैयक्तिक आहे. तर, सोनिया गांधी या वैद्यकीय सल्ल्यानुसार निवडणुकीपासून दूर आहेत. प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानच्या डाव्या डोळ्याला इजा झाल्यामुळे त्यांना सद्या दिल्लीतच थांबावे लागले आहे. येथील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये या मुलाला दाखल करण्यात आले आहे. रेहानला झालेली इजा हे कुटुंबाच्या गंभीर काळजीचे कारण बनले आहे.

Web Title: Priyanka Gandhi is away from the campaign?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.