प्रियंका गांधी व रॉबर्ट वाड्रांची भेट घेतली होती - ललित मोदी

By Admin | Updated: June 26, 2015 11:11 IST2015-06-26T11:11:15+5:302015-06-26T11:11:15+5:30

युपीए सरकार सत्तेत असताना प्रियंका गांधी व रॉबर्ट वाड्रांची भेट झाली होती असा दावा ललित मोदींनी केला आहे.

Priyanka Gandhi and Robert Vadra had met - Lalit Modi | प्रियंका गांधी व रॉबर्ट वाड्रांची भेट घेतली होती - ललित मोदी

प्रियंका गांधी व रॉबर्ट वाड्रांची भेट घेतली होती - ललित मोदी

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २६ - ललित मोदींची भेट घेतल्याने सुषमा स्वराज, वसुंधरा राजे व मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया गोत्यात आले असतानाच ललित मोदींनी प्रियंका गांधी व रॉबर्ट वाड्रांची भेट घेतल्याचे सांगत काँग्रेसला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने ललित मोदींचे आरोप फेटाळले आहेत. 

ललित मोदी प्रकरणामुळे केंद्रातील भाजपा सरकारची नाचक्की होत असतानाच शुक्रवारी या प्रकरणाला नवे वळण मिळाले. यूपीए सरकार सत्तेत असताना लंडनमध्ये प्रियंका गांधी व रॉबर्ट वाड्रा यांच्याशी भेट झाली होती असा दावा ललित मोदींनी केला आहे. या दोघांशी वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये भेट झाली होती,  त्यावेळी टिमी सारना हेदेखील उपस्थित होते, त्यांनी फोन केल्यास या भेटीची सर्व माहिती समोर येईल असेही त्यांनी सांगितले. 

ललित मोदीप्रकरणामुळे सुषमा स्वराज, वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यामुळे प्रियंका गांधी व वाड्रा यांच्या भेटीचा दावा करत ललित मोदींनी काँग्रेसला गोत्यात आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. 

Web Title: Priyanka Gandhi and Robert Vadra had met - Lalit Modi