प्रियंका घोडकेची महाराष्ट्र क्रिक ेट संघात निवड
By Admin | Updated: February 9, 2016 00:18 IST2016-02-08T22:56:02+5:302016-02-09T00:18:22+5:30
सिन्नर: येथील प्रियंका सुभाष घोडके हिची महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. मुंबई येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने आयोजित सदर क्रिकेट स्पर्धेत प्रियंका ही नाशिकची एकमेव खेळाडू ठरली आहे.

प्रियंका घोडकेची महाराष्ट्र क्रिक ेट संघात निवड
सिन्नर: येथील प्रियंका सुभाष घोडके हिची महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. मुंबई येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने आयोजित सदर क्रिकेट स्पर्धेत प्रियंका ही नाशिकची एकमेव खेळाडू ठरली आहे.
सलामीवीर आक्रमक फलंदाज असलेली प्रियंका उजव्या हाताने उत्कृष्ट फिरकी माराही करते. गत तीन वर्षांपासून ती महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील महिला क्रिकेट संघाची नियमीत खेळाडू राहिली आहे. गेल्या वर्षी पश्चिम विभागाच्या १९ वर्षाखालील संभाव्य भारतीय क्रिकेट संघातही तिचा समावेश झाला होता. माया सोनवणे हिच्या पाठोपाठ प्रियंकाही लवकरच पश्चिम विभागीय भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व करणार असल्याचा आशावाद तिचे प्रशिक्षक शिवाजी जाधव यांनी व्यक्त केला आहे.
या निवडीबद्दल प्रशिक्षक जाधव यांच्यासह माजी नगरसेवक किरण मुत्रक, राजेंद घोरपडे, राजमोहन ओझा यांच्यासह सिन्नरच्या क्रिकेटप्रेमींनी प्रियंकाचे कौतूक केले आहे. (वार्ताहर)
फोटो क्र. - 07२्रल्लस्रँ05
फोटो ओळी - प्रियंका घोडके