प्रियंका चोप्रा ओबामांसोबत जेवण घेणार

By Admin | Updated: April 29, 2016 05:03 IST2016-04-29T05:03:45+5:302016-04-29T05:03:45+5:30

प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत जेवण करण्याची संधी मिळणार आहे.

Priyanka Chopra will take a meal with Obama | प्रियंका चोप्रा ओबामांसोबत जेवण घेणार

प्रियंका चोप्रा ओबामांसोबत जेवण घेणार

लॉस एंजिल्स : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत जेवण करण्याची संधी मिळणार आहे.
दरवर्षी होणाऱ्या व्हाईट हाऊस करस्पॉन्डेन्टस् डिनर कार्यक्रमात प्रियंका चोप्रा ओबामांसोबत येत्या शनिवारी जेवण करणार असल्याच्या वृत्ताला स्वत: प्रियंका चोप्राने टिष्ट्वटरद्वारे दुजोरा दिला. भोजनप्रसंगी मिशेल ओबामाही उपस्थित असतील. अमेरिकेतील दूरचित्रवाणी मालिका ‘क्वाँटिको’मध्ये चोप्राने साकारलेल्या अलेक्स पॅरीश या पात्राला जागतिक मान्यता मिळाली आहे. प्रियंका आता बे-वॉच मालिकेतही काम करीत आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Priyanka Chopra will take a meal with Obama