शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
4
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
5
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ!
6
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
7
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
8
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
9
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
10
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
11
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
12
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
13
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
14
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
15
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
16
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
17
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
18
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
19
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
20
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी

पैशांसाठी लाजच सोडली! कुंभमेळ्यातील स्नान करणाऱ्या महिलांचे फोटो लावून विकताहेत 'ते' व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 14:19 IST

हॉस्पिटलमधील गरोदर महिलांचा खासगी व्हिडिओ लीक करुन ते टेलिग्रामवर विकले गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

Gujarat Maternity Hospital: हॉटेल्स आणि मॉल्समध्ये छुप्या कॅमेऱ्यांनी चेंजिंग रूम्सचे व्हिडीओ काढण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र आता गुजरातमधील एका रुग्णालयाचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकारामुळे गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे व्हिडीओ टेलिग्रामर विकण्यात आले आहेत. या घटनेनंतर रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. 

गुजरातमधील राजकोटमध्ये एका मॅटर्निटी रुग्णालयाचे व्हिडिओ लीक झाले आहेत. महिला रुग्णांच्या वैद्यकीय चाचण्यांदरम्यान रेकॉर्ड केलेले अनेक खासगी व्हिडिओ एका यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आले आहेत. तसेच हे व्हिडीओ टेलिग्राम चॅनेलवर विकण्यासाठी जाहिरात केली गेली. या प्रकरणी रुग्णालयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेघा एमबीबीएस या यूट्यूब चॅनेलवर पायल मॅटर्निटी हॉस्पिटलचे सात व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. त्यानंतर हे व्हिडीओ टेलिग्राम ग्रुपद्वारे ९९९ ते १५०० पर्यंत विकले जात होते. या खुलाशानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी रुग्णालयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले हे टेलिग्राम अकाऊंट चालवणाऱ्यांनी लोकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या थंबनेल इमेजमध्ये महाकुंभमध्ये स्नान करताना महिलांचे फोटो देखील वापरले होते.

गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजचा भाग आहेत, ज्यामध्ये महिला रुग्णांची डॉक्टरांकडून तपासणी करताना किंवा नर्सकडून इंजेक्शन घेताना दिसत आहे. तसेच हा टेलिग्राम ग्रुप सप्टेंबर २०२३ मध्ये तयार करण्यात आला होता. तर यूट्यूब चॅनल जानेवारी २०२४ मध्ये सुरू झाले होते. टेलिग्राम ग्रुपमध्ये ९० पेक्षा जास्त सदस्य होते, जे व्हिडिओ खरेदी करण्यासाठी पैसे देत होते.

"आरोपींनी यूट्यूबवर सात व्हिडिओ अपलोड केले होते आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली होती. ग्रुपमध्ये सामील होणाऱ्या लोकांकडून या व्हिडीओंसाठी पैशांची मागणी करण्यात आली होती. अधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी व्हिडिओचे स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आले होते," अशी माहिती  राजकोट सायबर क्राईम विभागाचे पोलीस अधीक्षक हार्दिक माकाडिया यांनी सांगितले.

दुसरीकडे, पायल मॅटर्निटी हॉस्पिटलने दावा केला की त्यांची सीसीटीव्ही यंत्रणा हॅक झाली असावी. "कोणीतरी आमच्या सीसीटीव्ही यंत्रणेचा ॲक्सेस घेतला आहे. आम्ही कोणतीही चूक केलेली नाही आणि पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करू, असं हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं आहे. मात्र अशा संवेदनशील खोलीत रुग्णालयाने सीसीटीव्ही कॅमेरे का बसवले गेले असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारीcctvसीसीटीव्हीPoliceपोलिस