शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अन्नधान्य खरेदीमध्येही आता खासगी कंपन्या! केंद्राचे सर्व राज्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 10:10 IST

केंद्राने सर्व राज्यांना पाठवले पत्र; खरेदी वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) आणि राज्य सरकारच्या संस्थांव्यतिरिक्त आता खासगी कंपन्याही लवकरच देशातील अन्नधान्य खरेदी प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी टीका सुरू केली आहे.

केंद्राच्या या योजनेची माहिती देताना केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे म्हणाले, देशातील बफर स्टॉकसाठी अन्नधान्य खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी केंद्र सरकार लवकरच खासगी क्षेत्रातील कंपन्यांना आमंत्रित करणार आहे. ते म्हणाले, यासंदर्भात अन्न मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना आधीच पत्र लिहिले आहे. यामुळे खरेदी प्रक्रियेत कार्यक्षमता येईल.

गव्हाच्या किमती का वाढल्या?nपांडे म्हणाले की, देशात गव्हाचा पुरेसा साठा असून गरज भासल्यास सरकार साठेबाजांवर कारवाई करेल. nएफसीआयच्या गोदामांमध्ये २.४ कोटी टन गहू उपलब्ध आहे. nकेंद्र गव्हाच्या साठ्याची माहिती देण्यासाठी आणि देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून साठा मर्यादेवर विचार करू शकते. देशातील गव्हाच्या किमती सट्टेबाजीमुळे वाढल्या आहेत, असे पांडे म्हणाले.

 राज्यांना स्पष्ट इशाराnअन्न सचिव म्हणाले, केंद्राने राज्य सरकारांना अन्नधान्याच्या खरेदीबाबत स्पष्ट संदेश दिले आहेत. nकेंद्र राज्यांकडून अन्नधान्य खरेदीसाठी जास्तीत जास्त केवळ दाेन टक्केपर्यंतच आकस्मिक खर्च देईल. राज्यांनी खरेदी व्यवस्था सुधारली नाही तर केंद्र सरकार त्यांना दाेन टक्के आकस्मिक खर्चही देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.  nकाही राज्यांनी त्यांच्या वतीने आठ टक्केपर्यंत कर आणि शुल्क लादले आहे, जे आतापर्यंत केंद्र सरकार भरत आहे.नेमकी कशाची खरेदी? सध्या प्रामुख्याने गहू आणि तांदूळ हे किमान आधारभूत किमतीच्या आधारावर थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केले जातात.हे धान्य कल्याणकारी योजनांतर्गत गरिबांमध्ये वितरित केले जाते.

खासगी क्षेत्र चांगली खरेदी करते : पांडेकेंद्रीय अन्न सचिव म्हणाले की, सरकार अन्नधान्य खरेदी प्रक्रियेत खासगी क्षेत्रालाही सहभागी करून घेऊ इच्छित आहे. फक्त अन्न महामंडळ आणि राज्य सरकारनेच अन्नधान्य विकत घ्यावे? मी नुकताच आंतरराष्ट्रीय धान्य परिषदेला गेले होते, जिथे खासगी कंपन्या खरेदीचे काम अधिक चांगल्याप्रकारे करत आहेत. सरकारी संस्थांपेक्षा कमी खर्चात आणि चांगल्या कार्यक्षमतेने अन्नधान्य खरेदीचे काम खासगी कंपन्या करू शकत असतील, तर सरकारला यात काही आक्षेप नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार