खाजगी बसमधून पावणेपाच लाख लंपास
By Admin | Updated: November 7, 2015 00:03 IST2015-11-07T00:03:39+5:302015-11-07T00:03:39+5:30
जळगाव- अहमदाबादकडे जाणार्या एका खाजगी बसमधून चार लाख ७८ हजार रुपये लंपास केल्याची घटना स्टेडियम परिसरात स्वामिनारायण ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास घडली.

खाजगी बसमधून पावणेपाच लाख लंपास
ज गाव- अहमदाबादकडे जाणार्या एका खाजगी बसमधून चार लाख ७८ हजार रुपये लंपास केल्याची घटना स्टेडियम परिसरात स्वामिनारायण ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास घडली. यासंदर्भात पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली, त्यात हा प्रकार फिर्याददारांचा बनाव असल्याचा दावा जिल्हापेठ पोलिसांनी केला आहे. बस गुजरातचीप्रवासी वाहतूक करणारी बस (क्र.जीजे ०१ वाय ००७०) गुजरातची आहे. ही बस भुसावळ येथून चार प्रवासी घेऊन जळगावात आली. येथे बसमध्ये १४ प्रवासी स्टेडियम परिसरातून बसले. बस अहमदाबादला जात होती. याच बसमध्ये पैसे चोरी प्रकरणातील फिर्याददार पंकज प्रवीणभाई पटेल, भातीजी राजाजी ठाकूर, जयेश जयंतीभाई पटेल (सर्व रा.महिसाणा, ह.मु.बळीराम पेठ) हेदेखील बसले. या तिघांनी शहरातील श्री स्वामी ट्रॅव्हल्सतर्फे तिकिटे घेतली होती. दोघे हवालाशी संबंधितपंकज पटेल व जयेश पटेल हे हवाला बाजाराशी संबंधित आहे. तर भातीजी ठाकूर हा स्वयंपाकी आहे. शहरातील व्यापारी व इतर व्यावसायिकांकडून घेतलेले पैसे गुजरातेत आपल्या मालकांकडे देण्याचे काम दोघे करतात. पण त्यांनी चार लाख ७८ हजार रुपये कुणाकडून घेतले व आपला मालक कोण याची नेमकी माहिती पोलिसांना दिलेली नाही. पाणी घ्यायला तिघे उतरले आणि चोरी झालीतिघे अहमदाबादला जाण्यासाठी बसमध्ये स्टेडियम परिसरात बसले. त्यानंतर पाण्याची बाटली घेण्यासाठी तिघे उतरले, असे फिर्यादीत म्हटले आहे. तिघे खाली असतानाच बसच्या उघड्या खिडकीतून आत येऊन कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पैसे चोरले. पैसे एका प्लास्टिकच्या आवरणाला चिकटपीने गुंडाळले होते. हे आवरण बॅगमध्ये तसेच काढून फेकले व पैसे नेले, असे पंकज पटेलने फिर्यादीत म्हटले आहे. स्वामी नारायण ट्रॅव्हल्सच्या सीसीटीव्हीत घटना कैद, पोलीस अनभिज्ञबस स्टेडियम परिसरात स्वामी नारायाण ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर उभी होती. या कार्यालयाबाहेर सीसीटीव्ही लावले आहेत. त्यात कुणीतरी बॅगमधून पैसे काढून त्याला गुंडाळलेले आवरण काढून पेसे नेत असल्याचे दिसते, असे बसमधील काही प्रवाशांनी सांगितले. याबाबत पोलिसांना विचारलेे असता असे सीसीटीव्ही आम्ही पाहिले नाही. ही ऐकीव माहिती आहे, असे त्यांनी सांगितले.