कारागृह पलायन प्रकरण
By Admin | Updated: February 18, 2015 23:53 IST2015-02-18T23:53:45+5:302015-02-18T23:53:45+5:30
कारागृहातून पळून मुलीचे

कारागृह पलायन प्रकरण
क रागृहातून पळून मुलीचे अपहरण, कैदी निर्दोषनागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पळून एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.जे. शर्मा यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका कैद्याची निर्दोष सुटका केली. सूरज श्याम अरखेल, असे या कैद्याचे नाव आहे. तो वर्धा येथील रहिवासी आहे. सूरज हा १७ सप्टेंबर २०१४ रोजी काम करण्याच्या बहाण्याने कारागृहाच्या बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने सदरच्या मोहननगर भागात राहणाऱ्या एका मुलीस लग्नाचे आमिष दाखवून मूर्तिजापूर येथे पळवून नेले होते. या प्रकरणी सूरजविरुद्ध सदर पोलिसांनी भादंविच्या ३६३, ३६६ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. त्याला अटक करून नागपुरात आणण्यात आले होते. तपास करून त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात आरोपीच्या वतीने ॲड. मीर नगमान अली यांनी काम पाहिले.