पेठवडगावात दारूभीवर छापा
By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:10+5:302014-12-20T22:28:10+5:30
नवे पारगाव : पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील सोनार्ली वसाहतीत पेठवडगाव पोलिसांच्या पथकाने दारूभीवर छापा टाकून एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

पेठवडगावात दारूभीवर छापा
न े पारगाव : पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील सोनार्ली वसाहतीत पेठवडगाव पोलिसांच्या पथकाने दारूभीवर छापा टाकून एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.या छाप्यात २० लिटर तयार दारू, दारूच्या रसायनाने भरलेली सहा बॅरल, काही रिकामी बॅरल्स, दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी एक मारुती व्हॅन असा एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल सापडला. राजेंद्र देविसिंग मचले, शकुंतला देविसिंग मचले व नरेंद्र देविसिंग मचले यांना पोलिसांनी अटक केली.