पंतप्रधानांवर धार्मिक भेदभावाचा आरोप
By Admin | Updated: August 7, 2014 02:25 IST2014-08-07T02:25:37+5:302014-08-07T02:25:37+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिरात पूजा (रुद्राभिषेक) केल्यावरून लोकसभेत मंगळवारी प्रचंड गदारोळ झाल्याने कामकाज तहकूब करावे लागले.

पंतप्रधानांवर धार्मिक भेदभावाचा आरोप
>जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिरात पूजा (रुद्राभिषेक) केल्यावरून लोकसभेत मंगळवारी प्रचंड गदारोळ झाल्याने कामकाज तहकूब करावे लागले.
पंतप्रधान मोदींनी नेपाळच्या दोन दिवसांच्या भेटीदरम्यान सोमवारी काठमांडूजवळील पशुपतीनाथ मंदिरात रुद्राभिषेक केला होता. त्यांनी येथे एक धर्मशाळा उभारण्यासाठी 25 कोटी रुपये देण्याची घोषणादेखील केली. तसेच 25क्क् किलो चंदन भेट दिले.
तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधानांनी उचलेल्या पावलाबद्दल (पूजा) आम्ही प्रशंसा करतो, परंतु त्यांनी गेल्या आठवडय़ात ईदच्या शुभेच्छादेखील द्यायला हव्या होत्या. पंतप्रधानांनी सर्व जाती, धर्माच्या लोकांना विजयादशमीनिमित्त विजयादशमीच्या आणि ईदनिमित्त ईदच्या शुभेच्छा द्यायला हव्यात. यात भेदभाव का बाळगला जातो, असे ते म्हणाले.
त्यांच्या वक्तव्यावर गोंधळ घालत असलेल्या भाजपाच्या खासदारांना बंडोपाध्याय म्हणाले, पंतप्रधानांनी नेपाळच्या एका मंदिरात पूजा केली. आम्ही त्यांची प्रशंसा करतो. परंतु त्यांनी ईद मुबारकदेखील म्हणायला हवे होते.
यावर उत्तर देताना संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू म्हणाले, आमचा सर्वधर्मसमभावावर विश्वास आहे. पंतप्रधानांनी ईदनिमित्त त्याच दिवशी राष्ट्राला विशेषत: मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या होत्या. नायडू यांच्या म्हणण्यानुसार, ईदच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी ‘ईद-उल-फितर की बधाई हो. यह पवित्र दिन हमारे देश भर मे शांती, एकता और भाईचारे के बंधन को और मजबूत करे’ असे आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले होते. मात्र, काँग्रेसचे या उत्तराने समाधान झाले नाही. पक्षाचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी या मुद्यांवर बोलण्याची परवानगी मागितली. अध्यक्षांनी त्यांना परवानगी न दिल्याने विरोधीपक्षाचे खासदार अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले आणि गदोराळ करू लागले. त्यामुळे 12.3क् वाजेर्पयत कामकाज तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर चौधरी यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली.
4रमझानच्या महिन्यात पंतप्रधानांनी इफ्तार पार्टी न दिल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीदेखील इफ्तार पार्टी दिली होती, असे ते म्हणाले. यावर अध्यक्ष सुमित्र महाजन यांनी ही व्यक्तिगत बाब असल्याचे म्हटले आणि हा मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी नाकारली. यामुळे काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी पुन्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर कामकाज पुन्हा
2 वाजेर्पयत तहकूब करण्यात आले.