शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम; जागतिक नेत्यांच्या यादीत सर्वात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 08:37 IST

यापूर्वी जून २०२३ मध्ये जागतिक नेत्यांची ॲप्रुव्हल रेटिंग यादी जाहीर करण्यात आली होती. त्यातही पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर होते

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीतील (ग्लोबल लीडर ॲप्रुव्हल लिस्ट) अव्वल स्थान कायम आहे. त्यांच्या नेतृत्वाला भारतातील ७६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. मोदी यांच्यानंतर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बर्सेट ६४ टक्के पाठिंब्यासह दुसऱ्या व मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर तिसऱ्या  क्रमांकावर आहेत. 

टॉप टेन नेते    लोकप्रियतानरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत        ७६%एलेन बरसेट, राष्ट्रपती, स्वित्झर्लंड    ६४%आंद्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रोडोर    ६१%लुईस दा सिल्वा, राष्ट्रपती, ब्राझील    ४९%अँथनी अल्बानीज, पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया    ४८%जॉर्जिया मेलोनी, पंतप्रधान, इटली    ४२%जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका    ४०%पेड्रो सांचेझ, पंतप्रधान, स्पेन     ३९%लिओ वराडकर, पंतप्रधान, आयर्लंड    ३८%जस्टिन ट्रुडो, पंतप्रधान, कॅनडा    ३७%

जूनमध्येही मोदीच होते अव्वलयापूर्वी जून २०२३ मध्ये जागतिक नेत्यांची ॲप्रुव्हल रेटिंग यादी जाहीर करण्यात आली होती. त्यातही पंतप्रधान मोदी अव्वल स्थानावर होते; परंतु मागील यादीच्या तुलनेत त्यांचे रेटिंग दोन टक्के कमी झाले आहे. गेल्या वेळी त्यांना ७८ टक्के ॲप्रुव्हल रेटिंग मिळाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन सातव्या स्थानावर होते, तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे १२व्या स्थानावर होते. आता या दोघांचेही स्थान घसरले आहे. 

कोणत्या माहितीचा घेतला आधार?डिसिजन इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने १४ सप्टेंबर रोजी ‘ग्लोबल लीडर ॲप्रुव्हल रेटिंग ट्रॅकर’ जारी केला आहे. ६ ते १२ सप्टेंबरदरम्यान गोळा केलेल्या डेटाच्या आधारे हे ॲप्रुव्हल रेटिंग देण्यात आले आहे. यात अनेक देशांतील लोकांशी बोलून त्यांचे जागतिक नेत्यांबद्दलचे मत जाणून घेण्यात आले. या यादीत २२ देशांच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे, त्यांपैकी बहुतांश जी-२० सदस्य आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी