शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची कडाडून टीका, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 09:25 IST

दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या पक्षांची झाली अधोगती, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे तेलंगणातील हैदराबाद येथे आयोजन करण्यात आले होते

हैदराबाद : देशावर दीर्घकाळ सत्तेवर राहिलेल्या पक्षांची आता अधोगती झाली आहे. त्याबद्दल त्या पक्षांची थट्टा करू नये तर या पक्षांनी केलेल्या चुकांपासून आपण धडा घेतला पाहिजे, असे मार्गदर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. लांगूलचालन, घराणेशाहीला देशातील जनता कंटाळली आहे. त्यामुळे घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षांचे अस्तित्व यापुढे प्रदीर्घ काळ टिकणे अशक्य आहे, अशी टीका मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचे तेलंगणातील हैदराबाद येथे आयोजन करण्यात आले होते. तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख व मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांची आघाडी उभारण्याच्या प्रयत्नात असताना, त्यांच्याच राज्यात भाजपने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक  आयोजित केली. दक्षिण भारतातील तेलंगणासह इतर राज्यांवर आपले यापुढे अधिक लक्ष असेल, असे या बैठकीतून भाजपने दाखवून दिले आहे.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताला जगात श्रेष्ठ बनविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. विरोधी पक्ष लांगूलचालनाचे राजकारण करतात. समाजातील सर्व घटकांचे कल्याण साधून भाजप कार्यकर्त्यांनी या राजकारणाला प्रत्युत्तर दिले पाहिजे.

हैदराबादला म्हणाले भाग्यनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर असा केला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकसंध भारताचा पाया रचला. आता श्रेष्ठ (महान) भारत घडविण्याची कामगिरी भाजपला पार पाडायची आहे.

तेलंगणामध्ये डबल इंजिनचे सरकार सत्तेत आणा : मोदीतेलंगणात डबल इंजिनचे सरकार सत्तेत आल्यास या राज्याचा आणखी प्रचंड विकास होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील जाहीर सभेत रविवारी सांगितले. ते म्हणाले की, २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांत तेलंगणामध्ये भाजपने जितके यश मिळविले त्यामध्ये त्यानंतरच्या कालावधीत आणखी वाढ झाली आहे.  राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपानंतर मोदी यांची हैदराबादमध्ये जाहीर सभा झाली. 

आगामी विधानसभा निवडणुकीत तेलंगणात भाजपला जनतेने विजयी करावे. राज्य व केंद्रात डबल इंजिनचे सरकार असावे, असा जनतेने कौल द्यावा. डबल इंजिन सरकारमुळे तेलंगणातील शहरी, ग्रामीण भागाचा झपाट्याने विकास होईल. ‘सबका साथ, सबका विकास’ हा आमचा मूलमंत्र आहे. त्यानुसार आम्ही तेलंगणाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत. केंद्र सरकारच्या योजनांचा मोठा लाभ तेलंगणातील जनतेला मिळत आहे, असेही मोदी म्हणाले.

‘केसीआर सरकार घराणेशाही, भ्रष्ट राजकारणाचे प्रतीक’तेलंगणामधील के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांचे सरकार हे घराणेशाही, भ्रष्ट राजकारणाचे प्रतीक बनले आहे अशी टीका करणारा एक प्रस्ताव भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या हैदराबाद येथे भरलेल्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, तेलंगणातील जनतेेसमोर असलेल्या सामाजिक, आर्थिक समस्यांमध्ये सतत वाढ होत आहे. केसीआर यांच्या सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. केसीआर व एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे दोघे मिळून तेलंगणाला लुटत आहेत असा आरोप केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा