पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले नितीशकुमार यांचे अभिनंदन
By Admin | Updated: November 8, 2015 12:49 IST2015-11-08T12:47:28+5:302015-11-08T12:49:26+5:30
बिहार विधानसभेत भाजपाचा पराभव करत विजयाची हॅट्रीक साधणा-या नितीशकुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले नितीशकुमार यांचे अभिनंदन
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - बिहार विधानसभेत भाजपाचा पराभव करत विजयाची हॅट्रीक साधणा-या नितीशकुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. तर नितीशकुमार यांनीही मोदींचे आभार मानले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी मतमोजणी सुरु असून मतमोजणीत जदयूप्रणित महाआघाडीची विजयाच्या दिशेने आगेकूच सुरु आहे. बिहारमध्ये महाआघाडीचे सत्ता येणार हे स्पष्ट होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरध्वनीव्दारे नितीशकुमार यांचे अभिनंदन केले आहे. मोदींनी ट्विटरव्दारे ही माहिती दिली आहे. तर दुरध्वनी करुन अभिनंदन केल्याबद्दल नितीशकुमार यांनीही मोदींचे आभार मानले आहेत.