शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींचेही 'करून दाखवले' अभियान सुरु होणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 20:16 IST

शेवटच्या 100 दिवसांत उदघाटनांचा धुमधडाका केला जाणार

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधाननरेंद्र मोदी हे चार वर्षांत कोणकोणती कामे 'करुन दाखवली' याची मोठी मोहिम उघडणार आहेत. पीएमओने पुढील तीन महिन्यांत पूर्णत्वास येणाऱ्या 25 प्रकल्पांची यादी बनविली असून शेवटच्या 100 दिवसांत उदघाटनांचा धुमधडाका केला जाणार आहे. या प्रकल्पांचा वापर मोदी सरकार प्रचारासाठी करणार आहेत.

 मागील महिन्यात पीएमओने सर्व राज्यांना कोणते प्रकल्प पूर्ण झाले आहेत किंवा पुढील काही महिन्यांत पूर्ण होणार आहेत याची माहिती मागविली होती. पंतप्रधान कार्यालयाच्या मुख्य सचिवांनी 2014 नंतर सुरु झालेल्या व चार वर्षांत पूर्ण केलेल्या  विकासकामांची माहिती मागविली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी या प्रकल्पांची यादी जाहीर करतील व सरकारने कामे केल्याचा प्रचार करतील. 

केंद्र सरकारने 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये एक प्रकल्प राबविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ज्या मंत्रालयांमध्ये सर्वाधिक प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत, त्यामध्ये नितीन गडकरी यांच्या खात्याचा समावेश आहे. मोदी पुढील तीन महिन्यांत अर्ध्या डझनपेक्षा जास्त रस्ते बांधकाम प्रकल्पांचे उद्घाटन करु शकतात. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. 

आयुषमान योजनेच्या प्रारंभासाठी जागेचा शोध25 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आयुषमान योजनेची मोठ्या प्रमाणात सुरुवात करणार आहेत .मात्र, अद्याप त्यांना ही योजना सुरु करण्यासाठी साजेशी जागा सापडलेली नाही. पुढील काही महिन्यांत ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत त्यापैकी एका राज्यात या योजनेची सुरुवात केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. या नवडणुकांपूर्वी किमान 50 लाख कुटुंबांना या योजनेची कार्डे वाटण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Nitin Gadkariनितीन गडकरीprime ministerपंतप्रधान