शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, कर्नाटक सरकार 'ही' मागणी करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 18:02 IST

पंतप्रधान १६ आणि १७ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.

ठळक मुद्देदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. 17 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

बंगळुरु : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र आणि राज्य सरकारवरील ताण वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि.16) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. 

दरम्यान, या चर्चेपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांनी सांगितले की, उद्या आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लॉकडाऊन आणखी शिथिल करण्याची मागणी करणार आहेत. तसेच, राज्यात लॉकडाऊन वाढविण्याची कोणतीही योजना नाही. वीकेंण्डलाही लॉकडाऊन करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकमधील इतर राज्यांतील बहुतेक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आम्हाला या लोकांसाठी क्वारंटाइनचे नियम बदलण्याची  गरज आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांना सात दिवसांची संस्थात्मक क्वारंटाइन आणि 7 दिवस होम क्वारंटाइन केले जाईल. दिल्ली आणि तामिळनाडूमधून येणा-या लोकांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले.

दिल्ली आणि तामिळनाडूहून येणाऱ्या लोकांना 3 दिवसांची संस्थात्मक क्वारंटाइन आणि 11 दिवसांचे होम क्वारंटाइन करण्यात येईल. संस्थात्मक क्वारंटाइन म्हणजे सरकारने तयार केलेले क्वारंटाइन सेंटर आहे. तसेच, कर्नाटकात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे, असेही मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभमूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी 16 जून रोजी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. पंजाब, आसाम, केरळ, उत्तराखंड, कर्नाटक आणि झारखंड अशा अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असून येथील रुग्णांचा रिकव्हरी रेट सुद्धा चांगला आहे.  याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जून रोजी ज्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. त्या राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहे. 17 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर आळा घाल्यासाठी सरकार युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 11 हजार 502 नवे रुग्ण आढळले. तर 325 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. चिंताजनक म्हणजे  भारतात कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 32 हजार 424 वर पोहोचली आहे. आतापर्यंत तब्बल 9 हजार 520 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आणखी बातम्या....

"अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

"हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे", आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओत छेडछाड, दिग्विजय सिंह यांच्यासह १२ जणांविरोधात एफआयआर दाखल

CoronaVirus News : अमित शहा 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, आज बोलविली सर्वपक्षीय बैठक       

पीएम केअर्स फंडाचे ऑडिट होणार, स्वतंत्र ऑडिटरची नियुक्ती

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकB. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पा