शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' राज्यातून लढवणार 2019 ची लोकसभा निवडणूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 13:15 IST

गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय भाजपासाठी मास्टरस्ट्रोक ठरला होता. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदी एका नव्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

भुवनेश्वर - गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय भाजपासाठी मास्टरस्ट्रोक ठरला होता. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदी एका नव्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्व भारतात भाजपाची पाळेमुळे भक्कम करण्यासाठी ओडिशामधील जगन्नाथ (पुरी) येथून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मोदींनी पुरी येथून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ओदिशातील भाजपाच्या समितीने दिला आहे. पंतप्रधान मोदींनी ओडिशातील भाजपाच्या कार्यकारिणीने दिलेला प्रस्ताव स्वीकारल्यास ते ओदिशामधून निवडणूक लढवणारे नरसिंह राव यांच्यानंतरचे दुसरे पंतप्रधान ठरतील. याआधी 1996 साली नरसिंह राव यांनी ओडिशामधील बरहामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसेच त्या निवडणुकीत  त्यांनी तब्बल 62.5 टक्के मते मिळवून बाजी मारली होती.  2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपाने पूर्व भारतावर लक्ष केंद्रित आहे.  मोदी यांनी पुरी येथून निवडणूक लढवल्यास कार्यकर्त्यांचाही आत्मविश्वास वाढेल, असा दावा भाजपाचे ओडिशा अध्यक्ष वसंत पांडा यांनी केला आहे. ओडिशामध्ये सध्या दीर्घकाळापासून सत्तेवर असलेल्या बीजेडीविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फायदा उठवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ओदिशातील २१ पैकी १, पश्चिम बंगालमधील ४२ पैकी २, तेलंगणामधील १७ पैकी १ आणि आंध्र प्रदेशमधील २५ पैकी २ जागांवर विजय मिळवला होता. आता या राज्यांमधून अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारणOdishaओदिशा