शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Narendra Modi: स्वत:मध्ये वेळीच बदल करा, अन्यथा...; पंतप्रधान नरेंद्र मोदींची खासदारांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 06:48 IST

भाजपच्या संसदीय दलाची बैठक झाली. त्यावेळी माेदींनी गैरहजर खासदारांची चांगलीच शाळा घेतली.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी संसदेच्या अधिवेशनात गैरहजर राहणाऱ्या आपल्याच पक्षाच्या खासदारांना चांगल्याच कानपिचक्या देतानाच तंबी दिली आहे. स्वत:मध्ये बदल केला नाही, तर भविष्यात याेग्य वेळी बदल  केले जातील, असा इशाराच माेदींनी दिला आहे.

भाजपच्या संसदीय दलाची बैठक झाली. त्यावेळी माेदींनी गैरहजर खासदारांची चांगलीच शाळा घेतली. ते म्हणाले, मी तुम्हाला वारंवार संसदेत उपस्थित राहण्यास सांगताे. तुम्ही अनुपस्थित राहिल्यास कामांवर परिणाम हाेताे. लहान मुलांसारखे सतत सांगणे मला आवडत नाही. यापुढे सर्व खासदारांनी नियमितपणे संसदेत आणि पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकांमध्ये उपस्थित राहायला हवे. स्वत:मध्ये बदल करा, नाहीतर मला माेठा बदल करावा लागेल, असे माेदींनी खडसावून सांगितले. पंतप्रधानांनी यापूर्वीही गैरहजर राहणाऱ्या खासदारांवर नाराजी व्यक्त केली हाेती. खासदारांनी विविध क्रीडा स्पर्धा, फिटनेस तसेच सूर्यनमस्कार इत्यादी स्पर्धांचे आयाेजन करण्यास पंतप्रधानांनी सर्व खासदारांना सांगितले आहे. तसेच आपापल्या मतदारसंघातील पद्म पुरस्कार विजेत्यांशी संपर्क ठेवून संवाद ठेवण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली.

‘चाय पे चर्चा’ आयाेजित करण्याच्या सूचनासर्व खासदारांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनानंतर आपापल्या मतदारसंघात स्थानिक नेत्यांसाेबत संवाद साधावा तसेच पक्ष बळकटीकरणासाठी ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमांचे आयाेजन करण्याच्या सूचना पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्या आहेत. पंतप्रधान माेदी यांच्या वाराणसी मतदारसंघात १४ डिसेंबरला सर्व भाजप नेत्यांना या कार्यक्रमासाठी बाेलाविण्यात येणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा