नवी दिल्ली : पंतप्रधाननरेंद्र मोदी आज शनिवारपासून तीन दिवस पाच राज्यांच्या दौऱ्यावर जात आहेत. यात मणिपूर, मिझोराम, आसाम, प. बंगाल आणि बिहार या राज्यांचा समावेश आहे.
मिझोराम : आयझोल-दिल्लीदरम्यान पहिल्या राजधानी एक्स्प्रेससह इतर नव्या रेल्वेंना हिरवी झेंडी दाखवतील.
आसाम : १३ रोजी सायंकाळनंतर १४ सप्टेंबरपर्यंत मोदी आसाम दौऱ्यात भारतरत्न भूपेन हजारिका जन्मशताब्दी महोत्सवात सहभागी होतील.
प. बंगाल : १५ सप्टेंबरला कोलकात्यात संयुक्त कमांडर संमेलनाचे उद्घाटन.
बिहार : १५ सप्टेंबरला बिहारमध्ये पूर्णिया येथे राष्ट्रीय मखाना महामंडळाचे उद्घाटन मोदी करतील.