शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

AMUमध्ये मोदी म्हणाले, राजकारणापेक्षा समाज मोठा; जे देशाचं, ते देशातील प्रत्येक नागरिकाचं

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 22, 2020 14:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याकडे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका वक्यव्याला उत्तर म्हणून बघितले जात आहे. मनमोहन सिंगांच्या या वक्तव्यावरून भाजपने मोठा गदारोळ केला होता. (AMU)

ठळक मुद्देसंविधानात नागरिकांसाठी जे अधिकार आहेत, ते सर्वांनाच मिळाले आहेत - मोदीजे देशाचे आहे, ते देशातील प्रत्येक नागरिकाचे आहे - मोदीआज प्रत्येक नागरिकाला कुठल्याही प्रकारच्या भेद-भावाशिवाय विकासाचा फायदा मिळत आहे - मोदी

लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी उत्तर प्रदेशातील अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या शताब्दी  महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक मोठे राजकीय वक्तव्यही केले. "जे देशाचे आहे, ते देशातील प्रत्येक नागरिकाचे आहे आणि संविधानात नागरिकांसाठी जे अधिकार आहेत, ते सर्वांनाच मिळाले आहेत," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 

‘जे देशाचे, ते सर्वांचे’ - पंतप्रधान मोदी म्हणाले, प्रत्येकाची सेवा करा, मग त्याचा धर्म अथवा जात कुठलीही असो, असा संदेश सर सय्यद यांनी दिला आहे. याच प्रकारे, देशाला समृद्ध करण्यासाठी त्याचा प्रत्येक पातळीवर विकास होणे आवश्यक आहे. आज प्रत्येक नागरिकाला कुठल्याही प्रकारच्या भेद-भावाशिवाय विकासाचा फायदा मिळत आहे. तसेच, नागरिकांनी संविधानने दिलेल्या अधिकारांसंदर्भात निश्चिंत रहावे, 'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास'च सर्वात मोठा मंत्र आहे.

पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याकडे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका वक्यव्याला उत्तर म्हणूनही बघितले जात आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी, यूपीएच्या पहिल्या कार्यकाळात डिसेंबर, 2006 मध्ये झालेल्या राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीत बोलताना, ‘समाजातील सर्व मागास आणि अल्पसंख्याक वर्गाला विशेषत: मुस्लिमांना विकासाच्या लाभात बरोबरीचा वाटा निश्चित करण्यासाठी त्यांचे सशक्तिकरण करण्याची आवश्यकता आहे. देशातील संसाधनांवर पहिला अधिकार त्यांचाच आहे,’ असे म्हटले होते.

यावेळी भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षाच्या भूमिकेत होता. मनमोहन सिंगांच्या या वक्तव्यावरून भाजपने मोठा गदारोळ केला होता. नव्हे, काँग्रेस आणि तत्कालीन यूपीए सरकार मुस्लिमांच्या तुष्‍टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोपही भाजपने केला होता. एवढेच नाही, तर भाजपने दीर्घकाळ हा मद्दा उचलून धरला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीगड मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना केलेले हे वक्तव्य मनमोहन सिंगांच्या वक्तव्याशी जोडले जात आहे. लाल बहादूर शास्त्रींनंतर नरेंद्र मोदी हे अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या कार्यक्रमात भाग घेणारे दुसरेच पंतप्रधान आहेत.

राजकारणापेक्षा समाज मोठा - पंतप्रधान मोदी म्हणाले, समाजात मतभेत असतात. मात्र, देशाच्या लक्ष्य प्राप्तीसाठी सर्व मतभेद बाजूला सारायला हवेत. देशात कुणीही कुठल्याही जाती अथवा धर्माचा असो, त्याने देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपले योगदान द्यायला हवे. मोदी म्हणाले, AMUमधून अनेक सेनानी बाहेर पडले आहेत. त्यांनी त्यांच्या विचाराला बाजूला सारत आपल्या देशासाठी लढा दिला. ते म्हणाले, राजकारण हे समाजाचे केवळ एक अंग आहे. मात्र, राजकारण आणि सत्तेपेक्षा देशातील समाज अधिक महत्वाचा असतो.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगBJPभाजपाcongressकाँग्रेस