शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

निवडणूक रोखे रद्द केल्याने देश पुन्हा काळ्या पैशांकडे ढकलला गेलाय... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 07:14 IST

आता प्रत्येकाला त्याचा पश्चात्ताप हाेईल : पंतप्रधान मोदी 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : निवडणूक रोखे योजना रद्द झाल्यामुळे देश पुन्हा काळ्या पैशाकडे ढकलला गेला आहे. प्रामाणिकपणे विचार केल्यास त्याचा प्रत्येकाला पश्चात्ताप होईल, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका मुलाखतीत सांगितले. गुन्हेगारी कारवायांतील  काळा पैसा तसेच अन्य स्रोतांतून आलेली बेहिशेबी रक्कम निवडणुका लढविण्यासाठी वापरली जात होती. ते रोखण्यासाठी निवडणूक रोख्यांची योजना सरकारने लागू केली होती. अर्थात ही योजना उत्तम पर्याय होता, असे आम्ही कधीही म्हटले नाही. मात्र, विरोधकांनी त्याबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरविली, असे मोदी म्हणाले.

‘स्वदेशात उत्पादनावर  भर’ इलॉन मस्क यांच्याकडून भारतात गुंतवणूक होण्याच्या शक्यतेबद्दल पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी सर्व गुंतवणूकदारांचे स्वागत करतो. पण, स्वदेशात उत्पादने तयार करण्यावर आम्ही अधिक भर दिला आहे.

...म्हणून आम्ही ही योजना आणली होती- निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत अनेक वर्षे देशात चर्चा सुरू होत्या. निवडणुकांसाठी खूप पैसा खर्च केला जातो. तशी कृती माझ्या पक्षासह इतर पक्षांनीही केली आहे. - मात्र, निवडणुकांची काळ्या पैशापासून कशी मुक्तता करता येईल, असा माझ्या मनात विचार होता. लोकांनी दिलेल्या देणग्यांच्या व्यवहारांत आम्हाला पारदर्शकता आणायची होती. त्यासाठी एक प्रयत्न म्हणून आमच्या सरकारने  रोख्यांची योजना राबविली होती.

विरोधी पक्षांनाही देणगी मिळाली मनी लाँडरिंगची प्रकरणे दाखल झाल्यानंतर १६ कंपन्यांनी निवडणूक रोख्यांची खरेदी केली. त्यातील ६३ टक्के रक्कम ही अन्य पक्षांना मिळाली. विरोधी पक्षांना देणग्या मिळाव्या म्हणून भाजप प्रयत्न करेल का? असा सवालही मोदी यांनी विचारला. 

नेत्यांविरोधात केवळ ३% ईडी प्रकरणेईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांपैकी फक्त तीन टक्के प्रकरणे राजकीय नेत्यांविरोधात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांना भीती वाटते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच त्यांच्या आप पक्षाचे नेते मनीष सिसोदिया, भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के. कविता यांना मद्य धोरण प्रकरणात झालेल्या अटकेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे विधान केले.

टॅग्स :electoral bondsइलेक्टोरल बॉन्डNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाprime ministerपंतप्रधान