पंतप्रधान मोदी, संसद भवन 'लष्कर-ए-तोयबा'च्या निशाण्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 16:11 IST2015-12-30T16:10:28+5:302015-12-30T16:11:14+5:30
नवीन वर्षात 'लष्कर-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनेकडून भारतात हल्ले होण्याची शक्यता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व संसद भवन दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला.

पंतप्रधान मोदी, संसद भवन 'लष्कर-ए-तोयबा'च्या निशाण्यावर
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - येत्या नववर्षात 'लष्कर-ए-तोयबा' या कुख्यात दहशतवादी संघटनेकडून भारतात हल्ले होण्याची शक्यता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व संसद भवन दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. सीमेपलीकडून सुमारे २० दहशतवादी देशात घुसले असून ते आत्मघाती हल्ले करण्याची शक्यता आहे, अशी माहितीही गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसद भवन, भारतीय लष्कराचे मुख्यालय आणि देशातील आण्विक केंद्रही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे सांगत त्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. विशेषत: नव्या वर्षाच्या निमित्ताने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून लोकप्रिय पर्यटनस्थळांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच महत्त्वाची ठिकाणे, धार्मिक स्थळे, बाजारपेठा व गर्दीची ठिकाणे येथे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे आदेश राज्य सरकारना देण्यात आले आहेत.