शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्शनपूर्वी मोदी गुजरातला २९ हजार कोटींची गिफ्ट देणार; देशातील पहिला सीएनजी टर्मिनल, मेट्रो, वंदे भारत...आणखी काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 13:48 IST

गुजरातच्या निवडणुका काही महिन्यात होणार आहेत. या पार्श्वभूमिवर गुजरातमध्ये राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत.

नवी दिल्ली :गुजरातच्या निवडणुका काही महिन्यात होणार आहेत. या पार्श्वभूमिवर गुजरातमध्ये राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान मोदींचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्यात मोदी गुजरातला २९ हजार कोटींचे गिफ्ट देणार असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील तिसऱ्या वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ  होणार आहे. यासह अमदाबाद मेट्रोलाही हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच सुरत, भावनगर या शहरात १० हजार कोटींच्या विकास कामांचे शुभारंभ करणार आहेत. 

केवळ PFIवर बंदी कशाला? आता संघावरही बंदी घाला, काँग्रेस नेत्यांनी केली अशी मागणी

सध्या देशभरात नवरात्री उत्साहात सुरू आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. पीएम मोदी भावनगरमध्ये जगातील पहिल्या सीएनजी टर्मिनलची पायाभरणीही करणार आहेत.

गांधीनगर-मुंबई तिसरी वंदे भारत रेल्वे

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गांधीनगर-मुंबई वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ते स्वत: या रेल्वेतून कालुपूरपर्यंत प्रवास करणार आहेत. देशात सध्या २ वंदे भारत रेल्वे सुरू झाल्या आहेत. आता तिसरी गांधीनगर ते मुंबई अशी रेल्वेसेवा सुरू होणार आहे. तसेच ते अहमदाबाद मेट्रोचेही उद्घाटन करणार आहेत.

राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलटांची लॉबिंग सुरू, आमदारांशी संपर्क वाढवला...

 दरम्यान, गुजरात विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यात होणार आहेत. सर्व पक्षांनी या निवडणुकांच्या तयारी सुरू केली आहे. आम आदमी पक्षाने आता गुजरातमध्येही पाऊल ठेवले आहे. तर काँग्रेसकडूनही जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजपनेही गुजरातकडे लक्ष केंद्रीत केले आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुजरात दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGujaratगुजरात