शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देशाला मिळाली तिसरी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस; पीएम मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 11:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसाचा गुजरात दौरा सुरू आहे. आज पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. देशाला आता तिसरी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे.

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसाचा गुजरात दौरा सुरू आहे. आज पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. देशाला आता तिसरी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. ही ट्रेन मुंबई ते गुजकरातमधील गांधीनगर अशी चालणार आहे. पंतप्रधान मोदी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत असताना भारत माता की जय च्या घोषणाबाजी सुरू होत्या. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी गांधीनगर रेल्वेस्थानकावरुन 'वंदे भारत एक्सप्रेसला' हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेने ५ तास २५ मिनिटात गांधीनगरमधून मुंबईला पोहाचू शकतो. पंतप्रधान मोदी अहमदाबादच्या गांधीनगरपासून कालापूरपर्यंत प्रवास करणार असल्याचे बोलले जात आहे. यासह मोदी अहमदाबाद मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. 

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस उद्यापासून धावणार

वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत. ही पूर्णपणे एसी असणार आहे. त्यासोबतच स्लाइडिंग दरवाजे, व्यक्तिगत वाचनासाठी दिवा, मोबाइल चार्जिंग पॉइंट, अटेंडेंट कॉल बटन, बायो-टॉयलेट, स्वचालित  द्वार, सीसीटीवी कॅमेरे, रिक्लाइनिंग सुविधा, आरामदायक सीट असणार आहेत.  

नुकताच रेल्वे मंत्रालयाने मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान रविवार सोडून दररोज धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी  सकाळी १०. ३० वाजता गांधीनगर येथून वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस ट्रेनच्या पहिल्या फेरीला हिरवा झेंडा दाखवणार आहे. प्रवाशांसाठी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस  अहमदाबाद  स्थानकावरून सकाळी १४. ०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १९.३५ वाजता पोहचले.

वेळापत्रक

मुंबई सेंट्रल येथून सकाळी ६.२० वाजता सुटेल आणि दुपारी १२.३० वाजता गांधीनगरला पोहचेल.  गांधीनगर येथून दुपारी १४.०५ वाजता सुटेल रात्री १९.३५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहचेल  सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दिवशी ही गाडी धावणार आहे. 

तिकीट दर 

चेअर कार तात्पुरते भाडे (केटरिंग शुल्क वगळून) मुंबई सेंट्रल ते सुरत- ६९० रुपये,  मुंबई सेंट्रल ते वडोदरा- ९०० रुपये ,  मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद - १०६० रुपये,  मुंबई सेंट्रल ते गांधीनगर -१११५ रुपये तर   एक्सकेटीव्ह क्लाससाठी तात्पुरते भाडे (खानपान शुल्क वगळून) मुंबई सेंट्रल ते सुरत-१३८५ रुपये , मुंबई सेंट्रल ते वडोदरा - १८०५  रुपये ,  मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद-२१२० रुपये ,  मुंबई सेंट्रल ते गांधीनगर-  २२६० रुपये असणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम".

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGujaratगुजरात