पंतप्रधान नरेंद्र मोदी पठाणकोटमध्ये दाखल
By Admin | Updated: January 9, 2016 14:12 IST2016-01-09T11:07:13+5:302016-01-09T14:12:41+5:30
गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पठाणकोट हवाई दलाच्या तळाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पठाणकोटमध्ये दाखल झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पठाणकोटमध्ये दाखल
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पठाणकोट हवाई दलाच्या तळाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पठाणकोटमध्ये दाखल झाले आहेत. हवाई दलाची पाहणी केल्यानंतर ते शहीद जवानांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
२ जानेवारीच्या रात्री लष्कराच्या वेषात आलेल्या काही दहशतवाद्यांनी पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर घुसून अंदाधुंद गोळीबार करत हल्ला चढवला. तसेच ग्रेनेड आणि लाईट मशिन गनच्या सहाय्याने हा हल्ला दहशतवाद्यांनी घडवून आणला. तीन दिवस चाललेल्या चकमकीनंतर भारतीय जवानांनी सहा अतिरेक्यांना यमसदनी धाडले, मात्र त्यात सात जवान शहीद झाले तर ५० हून अधिक जण जखमी झाले.
दरम्यान, पठाणकोट येथील हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाब शरीफ यांनी भारताने दिलेल्या पुराव्याच्या आधारे चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी नवाज शरीफ यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावून भारताने दिलेल्या माहितीवर वेगाने काम करण्याचे आदेश पाकिस्तानी अधिकाऱ्यांना दिले.