काही लोक दहशतवादाच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आले आहेत; फ्रान्स कार्टून वादावर मोदींचं भाष्य, म्हणाले...

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 31, 2020 10:55 AM2020-10-31T10:55:26+5:302020-10-31T11:04:08+5:30

आजच्या परिस्थितीत जगातील सर्व देशांना, सर्व सरकारांना आणि सर्व पंथांना दहशतवादाविरोधात एकत्रित येणे अत्यंत आवश्यक आहे. शांतता-बंधुता आणि परस्पर आदराची भावनाच मानवतेची खरी ओळख आहे. दहशतवाद आणि हिंसेने कधीही कुणाचेही कल्यान होऊ शकत नाही. (PM Narendra Modi )

Prime minister narendra modi commented on france cartoons dispute kevdia rashtriya ekta diwas  | काही लोक दहशतवादाच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आले आहेत; फ्रान्स कार्टून वादावर मोदींचं भाष्य, म्हणाले...

काही लोक दहशतवादाच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आले आहेत; फ्रान्स कार्टून वादावर मोदींचं भाष्य, म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्देआजच्या परिस्थितीत जगातील सर्व देशांना, सर्व सरकारांना आणि सर्व पंथांना दहशतवादाविरोधात एकत्रित येणे अत्यंत आवश्यक आहे - मोदीशांतता-बंधुता आणि परस्पर आदराची भावनाच मानवतेची खरी ओळख आहे - मोदीदहशतवाद आणि हिंसेने कधीही कुणाचेही कल्यान होऊ शकत नाही - मोदी

केवडिया - एकता दिवस निमित्त गुजरातमधील केवडिया येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्स कार्टून वादावरही भाष्य केले. काही लोक दहशतवादाच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आले आहेत. काही दिवसांत शेजारी देशातून ज्या बातम्या आल्या आहेत. तेथील संसदेत ज्या प्रकारे सत्य स्वीकारले गेले, त्याने या लोकांचा खरा चेहरा देशासमोर आणला आहे.

आजच्या परिस्थितीत जगातील सर्व देशांना, सर्व सरकारांना आणि सर्व पंथांना दहशतवादाविरोधात एकत्रित येणे अत्यंत आवश्यक आहे. शांतता-बंधुता आणि परस्पर आदराची भावनाच मानवतेची खरी ओळख आहे. दहशतवाद आणि हिंसेने कधीही कुणाचेही कल्यान होऊ शकत नाही.

काँग्रेसचे नव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, हे पुलवामा हल्ल्यानंतर केल्या गेलेल्या राजकारणावरून स्पष्ट झाले आहे. तेव्हा काय-काय बोलले गेले, कशा प्रकारची विधाने केली गेली, हे देश कधीही विसरू शकत नाही. 

सुरक्षादलाचे मनोबल वाढवा, राजकारण करू नका -
पंतप्रधान मोदी म्हणाले, मी अशा काही राजकीय पक्षांना विनंती करतो, की देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि आपल्या देशाच्या संरक्षण दलाच्या मनोबलासाठी कृपा करून, अशा प्रकारचे राजकारण करू नका. आपल्या स्वार्थासाठी आपण नकळत देशविरोधी शक्तींचा हातचे खेळणे होऊन, ना देशाचे हित करू शकाल, ना आपल्या पक्षाचे, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, एक गोष्ट नेहमीच लक्षात असू द्या, की आपल्या सर्वांसाठी देशहित सर्वात महत्वाचे आहे. आपण जेव्हा सर्वांच्या हिताचा विचार करू तेव्हा आपलीही प्रगती आणि उन्नती होईल. आपली विविधताच आपले अस्तित्व आहे. मोदी म्हणाले, आपण एक असू तर असाधारण असू. मात्र सहकाऱ्यांनो, हेही लक्षात असू द्या, की भारताची ही एकतेची ताकद दुसऱ्यांना नेहमीच खटकत असते, असेही मोदी म्हणाले.
 

Web Title: Prime minister narendra modi commented on france cartoons dispute kevdia rashtriya ekta diwas 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.