शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

पंतप्रधान माेदी रकाबगंज गुरुद्वारामध्ये नतमस्तक, अचानक भेट ठरल्याने सर्वांना आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 05:36 IST

Narendra Modi : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविराेधात शेतकरी आंदाेलन करीत आहेत. त्यातही पंजाबमधील शेतकरी जास्त आक्रमक आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी भल्या पहाटे दिल्लीतील गुरुद्वारा रकाबगंज साहिब येथे अचानक भेट देऊन शिखांचे नववे गुरू तेग बहादुर यांना श्रद्धांजली वाहिली. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविराेधात शेतकरी आंदाेलन करीत आहेत. त्यातही पंजाबमधील शेतकरी जास्त आक्रमक आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी गुरुद्वाराला भेट दिली. रकाबगंज साहिब गुरुद्वारा हे शीख समुदायाचे दिल्लीतील मानाचे धार्मिक स्थळ आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुद्वारा व्यवस्थापनालाही पंतप्रधान इथे येणार याबाबत काेणतीही माहिती नव्हती. पंतप्रधानांच्या भेटीच्या वेळी या परिसरात कुठलाही विशेष पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला नव्हता. तसेच सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी काेणत्याही प्रकारचे निर्बंध नव्हते. गुरुद्वाराला भेट दिल्यानंतर माेदींनी ट्विटरवरून छायाचित्रे पाेस्ट केली.पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ट्विटरवरील संदेशात लिहिले आहे, की ऐतिहासिक गुरुद्वारा रकाबगंज साहिब येथे भेट देऊन प्रार्थना केली. मी धन्य झालाे. जगभरातील लाखाे बांधवांप्रमाणे मीदेखील गुरू तेग बहादुरजी यांच्यापासून प्रेरित झालाे आहे.शिखांचे नववे गुर असलेले गुरू तेग बहादुर यांची शनिवारी पुण्यतिथी हाेती. त्यानिमित्ताने ट्विट करून माेदींनी  त्यांना आदरांजली वाहिली हाेती. गेल्या २३ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदाेलन सुरू आहे. त्यात २९ हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशभरात रविवारी श्रद्धांजली दिवस पाळण्यात आला. अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी गुरुद्वाराला भेट देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विराेधकांनी हा डॅमेज कंट्राेलचा प्रयत्न असल्याची टीका केली आहे.

१४ बड्या अडत्यांना प्राप्तिकराची नोटीसपंजाबमध्ये शेतीमालाच्या खरेदी-विक्री व्यवहारातील सुमारे १४ बड्या अडत्यांना प्राप्तिकर खात्याने नोटिसा बजावल्या आहेत. त्यातील काही जणांवर या खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या आहेत. शेतकरी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाला धमकाविण्यासाठी केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे, असा या अडत्यांचा आरोप आहे.

‘किसान एकता माेर्चा’ युट्यूब चॅनेलही  दिल्लीच्या सीमेवर आंदाेलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘किसान एकता माेर्चा’ या नावाने एक युट्यूब चॅनेल सुरू केले आहे. २५ डिसेंबरपर्यंत २५ लाख सबस्क्रायबर्स या चॅनेलला मिळवून दाखविण्याचे आव्हान शेतकरी नेत्यांनी पंतप्रधान माेदींना दिले आहे. 

शेतकऱ्याची आत्महत्यापंजाबमधील आणखी एका २२ वर्षीय शेतकऱ्याने विषप्राशन करुन आत्महत्या केली. भटिंडा जिल्ह्यातील हा शेतकरी हाेता. विविध कारणांनी मृत्यूुमुखी पडलेल्या शेतकऱ्यांचा आकडा आता ३० वर पाेहाेचला आहे.

शेतकरी सन्मान योजनेचा पुढचा हप्तापंतप्रधान शेतकरी सन्मान याेजनेचा पुढील हप्ता २५ डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा हाेणार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दिले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्य जयंतीला पैसे जमा हाेतील, असे माेदींनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmer strikeशेतकरी संप