शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

आज 73 वर्षांचे झाले पंतप्रधान मोदी; जाणून घ्या, त्यांना किती मिळते सॅलरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 17:42 IST

पंतप्रधान म्हणून मोदींना किती सॅलरी मिळते? आपल्याला माहीत आहे का?

पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिवस. 1950 मध्ये जन्मलेले पीएम मोदी आता 73 वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपकडून संपूर्ण देशभरात आज विविध कामांचे आयोजन करण्यात आले आहे. पण, पंतप्रधान म्हणून मोदींना किती सॅलरी मिळते? आपल्याला माहीत आहे का? 

भारताच्या पंतप्रधानाला किती मिळते वेतन? -भारताच्या पंतप्रधानाच्या वेतनासंदर्भात बोलायचे झाल्यास, सध्या भारताच्या पंतप्रधानाला 19 ते 20 लाख रुपये एवढे वार्षिक वेतन मिळते. तर मासिक वेतनासंदर्भात बोलायचे  झाल्यास, त्यांना जवळपास 1.60 लाख ते 2 लाख रुपये एवढे मासिक वेतन मिळते. यात बेसिक पे, दैनिक भत्ता, खासदार भत्ता आणि इतरही काही भत्त्यांचा समावेश असतो.

पंतप्रधान मोदींची संपत्ती -पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाइटवरील मार्च 2022 पर्यंतच्या उत्पन्न आणि मालमत्तेच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींकडे, 2.23 कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती आहे. ज्यामध्ये बहुतांश रक्कम ही बँक ठेवींच्या स्वरुपात आहे. पीएमओच्या खुलाशानुसार, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची स्थावर मालमत्ता नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची गांधीनगरमधील जमीन दान केल्याचे समजते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या 2014 पासून देशाचे अर्थात भारताचे 14वे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी 2001 ते 2014 पर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते वाराणसीतून खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्त आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रचारकही राहिले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारतBJPभाजपा