पंतप्रधान मोदींची संपत्ती - ४,७०० रु. रोख, १.४१ कोटी रु.ची मालमत्ता
By Admin | Updated: February 1, 2016 19:01 IST2016-02-01T19:01:44+5:302016-02-01T19:01:44+5:30
मोदींकडे रोख रक्कम अवघी ४,७०० रुपये आहे. तर त्यांच्या १३ वर्षापूर्वी खरेदी केलेल्या मालमत्तेचे मूल्य २५ पट वाढल्याने त्यांच्या एकूण मालमत्तेची किंमत १.४१ कोटी रुपये आहे.

पंतप्रधान मोदींची संपत्ती - ४,७०० रु. रोख, १.४१ कोटी रु.ची मालमत्ता
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - पंतप्रधान कार्यालयाने नरेंद्र मोदींच्या संपत्तीचा तपशील जाहीर केला असून ताज्या आकडेवारीनुसार मोदींकडे रोख रक्कम अवघी ४,७०० रुपये आहे. तर त्यांच्या १३ वर्षापूर्वी खरेदी केलेल्या मालमत्तेचे मूल्य २५ पट वाढल्याने त्यांच्या एकूण मालमत्तेची किंमत १.४१ कोटी रुपये आहे.
३१ जानेवारी २०१५ पर्यंत मोदींच्या स्थावर जंगम मालमत्तेचे मूल्य १ कोटी ४१ लाख १४ हजार ८९३ असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने वेबसाईटवर म्हटले आहे.
कुठल्याही प्रकारचे वाहन मोदींकडे नाही असे नमूद करण्यात आले असून दिल्लीमध्ये त्यांचे बँक खातेही नाही.
मोदींच्या डोक्यावर एकही रुपयाचे कर्जही नाही, त्यांच्याकडे १.१९ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या आहेत. मोदींच्या स्थावर मालमत्तेमध्ये गांधीनगरमधल्या एका जागेचा समावेश आहे.