शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या 'मैं भी चौकीदार' मोहिमेला मोठा झटका; निवडणूक आयोगाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 16:59 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'मैं भी चौकीदार' असलेला व्हिडिओ भाजपाचे निवडणूक समिचीचे सदस्य नीरज कुमार यांनी शेअर केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करत सुरु केलेल्या 'मैं भी चौकीदार' च्या मोहिमेला मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने भाजपाला नोटीस पाठविली असून प्रचाराचा व्हिडिओ परवानगी न घेताच सोशल मिडीयावर पोस्ट केल्याचा जाब विचारण्यात आला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'मैं भी चौकीदार' असलेला व्हिडिओ भाजपाचे निवडणूक समिचीचे सदस्य नीरज कुमार यांनी शेअर केला आहे. यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नीरज यांना उत्तरासाठी 3 दिवसांची मुदत दिली आहे. आयोगाने सांगितले की, 16 मार्चला या प्रकरणी मिडिया सर्टीफिकेशन अँड मॉनिटरिंग समितीने भाजपाला नोटीस पाठविली आहे. 'मैं भी चौकीदार'च्या प्रचाराच्या व्हिडिओमध्ये भाजपाने जवानांचेही चित्रिकरण दाखविले आहे. निवडणूक आयोगाने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सर्व पक्षांना लष्कराच्या कारवाईचा आणि त्यांच्या फोटोंचा वापर न करण्याची सक्त ताकीद दिली होती. मात्र, यानंतरही भाजपाने या व्हिडिओमध्ये जवानांचा वापर केला आहे. यावर आयोगाने जोरदार आक्षेप घेतला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपुर्वीच आपल्या ट्विटरवरील नावासमोर चौकीदार असे लिहिले होते. यानंतर सर्व नेत्यांनीही हाट कित्ता गिरवला होता. 'मैं हूं चौकीदार' ही मोहिमही भाजपाकडून राबविली गेली. तसेच नेटकऱ्यांना या अभियानाशी जोडण्याचे आवाहनही करण्यात आले होते. यावेळी भाजपाने हा व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यासह पत्रकार, शिक्षक, मुलांनी स्वत:ला चौकीदार असल्याचे म्हटले होते. 

तर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुब्रमनियन स्वामी यांनी चौकीदार न लावल्याचे कारण सांगितले होते. मी ब्राम्हण असून नावापुढे चौकीदार लावू शकत नाही. मी ज्या सूचना करेन त्यानुसार चौकीदाराला काम करावे लागेल. असे त्यांनी म्हटले होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक