हाशिम अन्सारी घेणार पंतप्रधान मोदी यांची भेट
By Admin | Updated: December 6, 2014 00:10 IST2014-12-06T00:10:21+5:302014-12-06T00:10:21+5:30
अयोध्या- ५३ वर्षांपासून बाबरी मशिदीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने लढा देणारे मोहम्मद हाशिम अन्सारी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

हाशिम अन्सारी घेणार पंतप्रधान मोदी यांची भेट
लखनौ : अयोध्या- ५३ वर्षांपासून बाबरी मशिदीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने लढा देणारे मोहम्मद हाशिम अन्सारी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
बाबरी प्रकरणाचे राजकारण करण्यात आल्याने आपण यापुढे बाबरीसाठी लढणार नाही असे अन्सारी यांनी जाहीर केले आहे. अन्सारी यांनी आता रामलल्ला मुक्त झालेला पाहायचे आहे असे म्हटले आहे. तसेच शनिवारी ६ डिसेंबर रोजी बाबरी विध्वंसदिनी आपण कोणताही कार्यक्रम न करता घराचे दार बंद करू असे म्हटले आहे.
हनुमान गडचे महंत व आखाडा परिषदेचे अध्यक्ष ज्ञानदास यांच्यासह अयोध्येत स्वच्छ चारित्र्याच्या हिंदू नेत्याना पाठिंबा देण्याचे संकेत अन्सारी यांनी दिले असून, राजकारणाला वेगळी कलाटणी दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीत अन्सारी लोकांसाठी चांगले काम केले आहे. मीही एक अन्सारी असल्याने माझा पाठिंबा आता मोदी यांना राहील असे अन्सारींनी म्हटले आहे. तसेच अन्सारी यांनी महंत ज्ञानदास यांनाही भेटणार असल्याचे म्हटले असून बाबरी प्रश्न हा सर्व देशाचा आहे असेही सांगितले आहे. (वृत्तसंस्था)