PM मोदींनी ब‍िल गेट्स यांना सांगितलं आपल्या जॅकेटचं 'राज'! कशापासून होतं तयार? तुम्हीही जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 01:21 PM2024-03-29T13:21:25+5:302024-03-29T13:27:08+5:30

यावेळी बिल गेट्स यांनी टेक्नॉलॉजीचा वेगाने अवलंब करण्याबरोबरच नेतृत्व क्षमतेबद्दलही भारतीयांचे कौतुक केले. तसेच, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी गेट्स यांना नमो ॲपवरील फोटो बूथचा वापर करून सेल्फी घेण्यास प्रोत्साहित केले.

Prime Minister Modi told Bill Gates the 'secret' of his jacket know about What is it made of | PM मोदींनी ब‍िल गेट्स यांना सांगितलं आपल्या जॅकेटचं 'राज'! कशापासून होतं तयार? तुम्हीही जाणून घ्या

PM मोदींनी ब‍िल गेट्स यांना सांगितलं आपल्या जॅकेटचं 'राज'! कशापासून होतं तयार? तुम्हीही जाणून घ्या

पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी शुक्रवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी फ्री-व्हीलिंग चॅटमध्ये बऱ्याच विषयावर चर्चा केली. यात आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सपासून डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर ते हवामान बदलाचा सामना करण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांपर्यंत अनेक गोष्टींचा सामावेश होता. यावेळी बिल गेट्स यांनी टेक्नॉलॉजीचा वेगाने अवलंब करण्याबरोबरच नेतृत्व क्षमतेबद्दलही भारतीयांचे कौतुक केले. तसेच, पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी गेट्स यांना नमो ॲपवरील फोटो बूथचा वापर करून सेल्फी घेण्यास प्रोत्साहित केले.

बिल गेट्स यांच्या सोबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, COP26 शिखर परिषदेत घोषित करण्यात आलेल्या 'पंचामृत' प्रतिज्ञांसह भारताच्या महत्त्वाकांक्षी हवामान बदलासंदर्भातील वचनबद्धतेसंदर्भातही भाष्य केले. यावेळी पंतप्रधान मरेंद्र मोदी यांनी, र‍िसायक‍ल करून तयार करण्यात आलेल्या आपल्या जॅकेटसंदर्भातही बिल गेट्स यांना महिती दिली. ते म्हणाले, हे जॅकेट टिकाऊ पद्धतीने आणि पर्यावरण व्यवस्थापनासाठी भारताच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सांगितले की टेलर जे कपडे कापतो, त्यांनंतर जो कपडा उरतो, त्या कपड्यापासून हे जॅकेट तयार करण्यात आले आहे.

मोदी म्हणाले, पहिल्या आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीदरम्यान आम्ही मागे राहिलो. कारण आम्ही एक वसाहत होतो. आता चौथ्या औद्योगिक क्रांतीत डिजिटल घटक आमचा गाभा आहे. मला विश्वास आहे की, याचा भारताला प्रचंड फायदा होईल. यात एआयची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मी कधी कधी गमतीत म्हणत असतो, आमच्या देशात 'मां'ला ‘आई’ म्हणून संबोधले जाते. आता मी म्हणतो की, जेव्हा मूल जन्माला येते, तेव्हा ते आपला पहिला शब्द ‘ऐ’ देखील बोलते आणि ‘एआई’ही बोलते, कारण मुलं एवढी प्रगत झाली आहेत.

एआयच्या वापरासंदर्भातरीह भाष्य -
पीएम मोदी यांनी देशातील एआयच्या वापरासंदर्भातरीह भाष्य केले ते म्हणाले. "मी भाषेच्या वापरासाठी जी20 शिखर सम्मेलनादरम्यान एआयचा वापर केला. आपल्या सर्व ड्रायव्हर्सनी जी20 समिटदरम्यान एक एआय अ‍ॅप डाउनलोड केले होते. या अ‍ॅपचा वापर ते समिटमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आलेल्या विविध परदेशी पाहुण्यांशी संवाद साधण्यासाठी करत होते. 

आपल्या नमो अ‍ॅपवर AI च्या वापरासंदर्भात बिलगेट्स यांना माहिती देनाता, पंतप्रधान मोदी यांनी बिल गेट्स यांना नमो अ‍ॅपच्या माध्यमाने सेल्फी घेण्यास सांगितले. यानंतर पीएम मोदींसोबतचे बिलगेट्स यांचे सर्व जुने फोटो मोबाइलवर दिसू लागले.

Web Title: Prime Minister Modi told Bill Gates the 'secret' of his jacket know about What is it made of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.