शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 06:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख शहजादा (युवराज) असा करतात. त्या वक्तव्याला प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

लखानी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शहेनशहा असून ते महालात राहतात. त्यांचा जनतेशी असलेला संपर्क संपूर्णपणे तुटलेला आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी शनिवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदीकाँग्रेस नेते राहुल गांधी यांचा उल्लेख शहजादा (युवराज) असा करतात. त्या वक्तव्याला प्रियांका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

गुजरातमधील बनासकांठा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार गेनीबेन ठाकोर यांच्या प्रचारासाठी लखानी येथे झालेल्या सभेत प्रियांका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी माझा भाऊ राहुल गांधी यांना शहजादा म्हणतात. पण, मी त्यांना सांगू इच्छिते की, हा शहजादा लोकांचे प्रश्न ऐकण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ४ हजार किमी पायी चालत गेला. तो असंख्य बंधू-भगिनी, शेतकरी, कामगार यांना भेटला. त्यांचे प्रश्न कसे सोडविता येतील याविषयी राहुल गांधी यांनी लोकांशी चर्चा केली.

शहजाद्याला पंतप्रधान बनविण्यासाठी पाकिस्तान आतुर झाला आहे. शत्रूंना भारतामध्ये केंद्रात दुर्बल सरकार हवे आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गुजरातमधील सभेत केले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी हे शहेनशहा आहे. एकही सुरकुती नसलेले, अतिशय स्वच्छ कपडे घालणारे, डोक्यावरचे केस अजिबात न विस्कटलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही सर्वजण नेहमीच पाहात असाल. अशा व्यक्तीला सर्वसामान्य लोकांच्या काबाडकष्टाचे महत्त्व कसे समजणार? त्यांना शेतीतल्या समस्यांचे आकलन कसे होणार? त्यांना सामान्य माणसांचे प्रश्न, महागाईने होरपळलेली जनता याची दु:खे कधीही समजणार नाहीत. (वृत्तसंस्था)

‘भाजपला देशाची राज्यघटना बदलायची आहे’काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितले की, भाजपला देशाची राज्यघटना बदलायची आहे. लोकांना राज्यघटनेने दिलेले हक्क कमी करायचे आहेत. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या हक्कांवर गदा आणण्याचे काम केले आहे.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी