शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींनी तयार केलाय 2047 पर्यंतचा रोड मॅप, भाजपच्या दिग्गज नेत्याचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 10:27 IST

...2024 आणि 2027 चा शंखनादच नाही, तर 2047 पर्यंतचा रोड मॅपही पंतप्रधान मोदी यांनी तयार केल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील मऊ (Mau) येथे घोसी विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत जनता कुणाला विधानसभेवर पाठवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याशिवाय, भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही संपूर्ण शक्ती झोकून दिल्याचे दिसत आहे. यातच, ही 2023 ची पोट निडवणूक आहे. 2024 आणि 2027 चा शंखनादच नाही, तर 2047 पर्यंतचा रोड मॅपही पंतप्रधान मोदी यांनी तयार केल्याचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटले आहे.

यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यंनी सपावर जोरदार हल्ला चढवला. घोसी पोटनिवडणुकीतील उमेदवार दारा सिंह चौहान यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना मौर्य म्हणाले, दारा सिंह चौहान यांनी सपाची विचारधारा सोडून आणि चुका सुधारून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सपाची विचारधारा घराणेशाही, दंगलवादी, जातीयवादी आणि गुन्हेगारीची आहे. यामुळे दारा सिंह चौहान यांनी सपा सोडली आहे.

2047 पर्यंतचा रोड मॅप तयार - उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले, ही 2023 ची पोट निडवणूक आहे. 2024 आणि 2027 चा शंखनादच नाही, तर 2047 पर्यंतचा रोड मॅपही पंतप्रधान मोदी यांनी तयार केला आहे. सपा, बसपा आणि काँग्रेसने गरिबांना लुटून आपली तिजोरी भरली आहे. भ्रष्टाचार करून बँका भरल्या आहेत. गरिबांच्या जमिनींवर, घरांवर आणि दुकानांवर कब्जा केला आहे. मात्र, भाजप सरकार भ्रष्टाचारमुक्त, तुष्टीकरणमुक्त, घराणेशाहीमुक्त, राजकारण पुढे नेण्यासाठी संपूर्ण शक्तीने काम करत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन -केशव प्रसाद मौर्य म्हणाले, भाजप आपल्या मित्रपक्षांसह पूर्वांचलातील सर्वच्या सर्व 80 जागा जिंकेल. मऊमध्ये पोटनिवडणूक होत आहे. येथे लोकांचा जबरदस्त उस्ताह दिसत आहे. सपाचे डिपॉझिटही जप्त होईल. विकासाच्या वेगात मऊ देखील धावू लागेल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण