पंतप्रधान मोदींनी केले दीदी, अम्मांचे अभिनंदन

By Admin | Updated: May 19, 2016 13:19 IST2016-05-19T13:13:23+5:302016-05-19T13:19:53+5:30

पश्चिम बंगाल तसेच तामिळनाडूमध्ये अभूतपूर्व विजय मिळवून निर्विवाद सत्ता गाजवणा-या ममता बॅनर्जी व जयललिता यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिनंदन केले.

Prime Minister Modi didi, Amma congratulated | पंतप्रधान मोदींनी केले दीदी, अम्मांचे अभिनंदन

पंतप्रधान मोदींनी केले दीदी, अम्मांचे अभिनंदन

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - पश्चिम बंगाल तसेच तामिळनाडूमध्ये अभूतपूर्व विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व गाजवणा-या ममता बॅनर्जी जयललिता यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूरध्वनीवरून अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. पश्चिम बंगालमधील मतदारांनी तृणमूल काँग्रेसला भरघोस मतदान करून पक्षाला दणदणीत विजय मिळवून दिल्याने पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी सलग दुस-यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. तर अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी तामिळनाडूत निर्विवाद वर्चस्व गाजवत विरोधाकांना भुईसपाट केले आहे. दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जी व जयललिता यांना फोन करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल)
 

Web Title: Prime Minister Modi didi, Amma congratulated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.