पंतप्रधानांनी मराठीतून ट्वीट करत केले शिवरायांना नमन

By Admin | Updated: February 19, 2017 08:12 IST2017-02-19T08:12:48+5:302017-02-19T08:12:48+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटर हँडलवरुन मराठी भाषेत चार ट्वीट करत शिवरायांना नमन केले आहे

The Prime Minister made tweets in Marathi and bowed to Shivrajaya | पंतप्रधानांनी मराठीतून ट्वीट करत केले शिवरायांना नमन

पंतप्रधानांनी मराठीतून ट्वीट करत केले शिवरायांना नमन

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी ट्विटरद्वारे शिवजी महाराजांना नमन केलं आहे. तारखेनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त राज्यासह देशभरता विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटर हँडलवरुन मराठी भाषेत चार ट्वीट करत शिवरायांना नमन केले आहे. यामध्ये त्यांनी मुंबई येथे अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या भव्य शिवस्मारकचे जल-भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे भाग्य लाभले असे म्हणत हा दिवस सदैव स्मरणात राहील अशी आठवणही त्यांनी सांगितली. तर पहिल्या ट्वीटसह मोदींनी शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाचा फोटो पोस्ट केला आहे.

Web Title: The Prime Minister made tweets in Marathi and bowed to Shivrajaya