शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सैफीनाचा मुलगा 'तैमुर'सोबत होतेय या 'गोंडस' मुलाची तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 15:29 IST

भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंध वेगाने वृद्धींगत होत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो 17 फेब्रुवारीपासून ते 24 फेब्रुवारीपर्यंत अशा आठवड्याभराच्या भारत दौ-यावर आहेत.

नवी दिल्ली -  भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंध वेगाने वृद्धींगत होत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो 17 फेब्रुवारीपासून ते 24 फेब्रुवारीपर्यंत अशा आठवड्याभराच्या भारत दौ-यावर आहेत. मात्र या दौ-यादरम्यान जस्टिन ट्रुडो यांच्याहून त्यांचा छोटा मुलगा सर्वाच्या चर्चेचा विषय ठरला आहे. जस्टिन ट्रुडो आपल्या तीन अपत्यांसहीत (एक मुलगी व दोन मुले) भारताच्या दौ-यावर आले आहेत. भारतात दाखल झाल्यानंतर विमानतळाहून बाहरे येताना जस्टिन ट्रुडो यांचा छोटा मुलगा हॅड्रियन फुलांचा गुच्छा घेत सर्वांच्या पुढे तुरू तुरू चालताना दिसला. हॅड्रियनचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्याला प्रचंड पसंती दर्शवली. 

विमानतळाहून बाहेर येताना 3 वर्षांच्या गोंडस हॅड्रियनचा सुंदर फोटो कॅमे-यात कैद करण्यात आला आहे. ट्विटरवर या फोटोला नेटीझन्सनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. शिवाय,  या क्युट फोटोवरुन नेटीझन्सनी हॅड्रियनची तुलना सैफ अली खानच्या तैमुरसोबतही करण्यात आली आहे. काही युजर्सनी तर या आठवड्यात हॅड्रियननं तैमुरची जागा घेतल्याचंही ट्विट केले. 

यानंतर रविवारी (18 फेब्रुवारी) आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी पोहोचलेल्या सहकुटुंब पोहोचलेल्या जस्टिन ट्रुडो यांनी हॅड्रियनला हवेत फेकून त्याला पुन्हा झेलल्याचा फोटोदेखील नेटीझन्सना खूपच आवडला आहे.  या दौ-यादरम्यान जस्टिन ट्रुडो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संरक्षण, दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सहकार्यासहीत अनेक मुद्यांवर चर्चा करणार आहेत.  आग्र्यानंतर जस्टिन मुंबई, अहमदाबाद, अमृतसर या शहरांना भेट देणार आहेत. जस्टीन ट्रुडो हे कॅनडाचे माजी पंतप्रधान पिएरे ट्रुडो यांचे पुत्र. त्यामुळे राजकारणाची आणि लिबरल पक्षाच्या धोरणांची माहिती त्यांना लहानपणापासूनच मिळत होती.

बॉक्सर, अॅक्टर पंतप्रधान बॉक्सिंग करणारे, शाळेत शिकवणारे जस्टिन हे खरंच आगळावेगळे पंतप्रधान आहेत. जस्टिन  तरुणांच्या चर्चामधे विविध कारणांनी येत आहेत. त्यांचे कपडे, हेअरस्टाईल इथपासून त्यांच्या विविध मतांर्पयत माध्यमांसकट सर्वत्र चर्चा होत आहे. टॅटू असणारे ते जगातले पहिलेच पंतप्रधान असावेत. त्यांच्याबाबत सांगण्याजोगी आणखी एक वेगळेपणाची बाब म्हणजे पहिल्या महायुद्धावर आधारित 'द ग्रेट वॉर' या सिनेमातही त्यांनी काम केले आहे.   

 

टॅग्स :Justin Trudeauजस्टीन ट्रुडोIndiaभारतTaimurतैमुर