स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

By Admin | Updated: April 18, 2015 01:43 IST2015-04-18T01:43:24+5:302015-04-18T01:43:24+5:30

मोहोळ :

The pride of successful students in the competition examinations | स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

होळ :
येथील भीम युवा प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतील 10 यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव पो़नि़ सूरज बंडगर यांच्या हस्ते करण्यात आला़ अध्यक्षस्थानी अँड़ विनोद कांबळे होत़े
उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल विवेक काळे (अनगर), पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले अतुल खंदारे (कुरुल), भाग्यर्शी झेंडगे (भांबेवाडी), गणेश कोल्हाळ (एकुरके), सलील धनवे (वाळूज), सुखदेव बोधे (डिकसळ), संतोष खंदारे (कुरुल), जीवन शेरखाने (राळेरास) यांचा शाल, र्शीफळ व डॉ़ बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला़
यावेळी प्राचार्य र्शीधर उन्हाळे, बाजार समितीचे उपसभापती जगन्नाथ कोल्हाळ, प्राथमिक शिक्षक समितीचे सरचिटणीस राजकुमार राऊत, हणमंत बंडगर, मदन कुलकर्णी, धर्मराज चवरे, अँड़ सीताराम केवळे, युवराज पवार, आण्णा सुरवसे, रमेश दास आदी उपस्थित होत़े कार्यक्रमासाठी दादा कापुरे, हणमंत यादव, लखन घाटे, मनोहर गोडसे, बिभीषण खंदारे, सुनील कांबळे, लक्ष्मण बनसोडे, प्रवीण कापुरे यांनी पर्शिम घेतल़े सूत्रसंचालन गणेश भंडारे यांनी केले तर आभार दिनेश माने यांनी मानल़े (वार्ताहर)

फोटो ओळी
मोहोळ येथील भीम युवा प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतील 10 यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव पो़नि़ सूरज बंडगर यांच्या हस्ते करण्यात आला़ त्याप्रसंगी अँड़ विनोद कांबळे, र्शीधर उन्हाळे, जगन्नाथ कोल्हाळ, हणमंत बंडगर, राजकुमार राऊत आदी़

Web Title: The pride of successful students in the competition examinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.