शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

येत्या 1 एप्रिलपासून 800 अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार; जाणून घ्या कारण..?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 9:20 PM

या औषधांच्या यादीमध्ये पेनकिलर, अँटीबायोटिक आणि अँटी-इन्फेक्शन औषधांचाही समावेश आहे.

Medicine Price Hike : वाढत्या महागाईत जनतेला आणखी एक झटका बसणार आहे. येत्या 1 एप्रिल 2024 पासून 800 औषधांच्या किमती वाढणार आहेत. या औषधांच्या यादीमध्ये पेनकिलर, अँटीबायोटिक आणि अँटी-इन्फेक्शन औषधांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारने होलसेल प्राइस इंडेक्‍समध्ये (WPI) अनेक बदल केले आहेत. तसेच, सरकार राष्ट्रीय आवश्यक औषध यादीमध्ये (NLEM) 0.0055 टक्क्यांची वाढ करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून औषध कंपन्यांकडून वाढत्या महागाईमुळे दर वाढवण्याची मागणी होत आहे.

यापूर्वी 12% आणि 10% वाढ झाली

यापूर्वी 2022 मध्ये औषधांच्या किमतीत 12 टक्के आणि 10 टक्क्यांनी वाढ झाली होती. रिपोर्टनुसार, वर्षातून एकदा औषधांच्या किमतीत वाढ करण्यास मान्यता दिली जाऊ शकते. गेल्या काही वर्षांत औषधात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतीत 15 ते 130 टक्के वाढ झाली आहे. पॅरासिटामॉल 130 टक्क्यांनी वाढली आहे, तर एक्सीसिएंट्सच्या किमती 18-262 टक्क्यांनी वाढल्या आहेत. इतर अनेक औषधांच्या किमती वाढल्या आहेत.

आवश्यक औषधे काय आहेत?ज्या औषधांचा बहुतांश लोक नियमित वापर करतात, त्यांचा या यादीत समावेश होतो. या औषधांच्या किमती सरकारच्या नियंत्रणात असतात. कंपन्या या औषधांच्या किमती वर्षभरात केवळ 10 टक्के वाढवू शकतात. या यादीत कर्करोगविरोधी औषधांचाही समावेश आहे. अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्ये पॅरासिटामॉल सारखी औषधे, ॲझिथ्रोमायसिन सारखी अँटीबायोटिक्स, ॲनिमिया औषधे, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी काही औषधे आणि स्टिरॉइड्सदेखील यादीत आहेत. 

किमती का वाढणार?उद्योग तज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांमध्ये काही प्रमुख सक्रिय औषधी घटकांच्या किमती 15% ते 130% च्या दरम्यान वाढल्या आहेत. पॅरासिटामॉलच्या किमतीत 130% आणि एक्सिपियंट्सच्या किमती 18-262% ने वाढल्या आहेत. ग्लिसरीन आणि प्रोपीलीन ग्लायकॉलसह सॉल्व्हेंट्स, सिरप अनुक्रमे 263% आणि 83% ने महाग झाले आहेत. इंटरमीडिएट्सच्या किमतीही 11% ते 175% च्या दरम्यान वाढल्या आहेत. पेनिसिलिनदेखील 175% महाग झाली आहे. त्यामुळेच एक हजारहून अधिक भारतीय औषध उत्पादकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या  गटानेही सरकारला सर्व विहित फॉर्म्युलेशनच्या किमतींमध्ये 10% वाढ करण्यास त्वरित प्रभावाने परवानगी देण्याची विनंती केली होती. तसेच नॉन शेड्यूल औषधांच्या किमतीत 20% वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता यात वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :medicineऔषधंbusinessव्यवसायInflationमहागाईMedicalवैद्यकीय