पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात २ रुपयांनी वाढ

By Admin | Updated: January 1, 2015 20:07 IST2015-01-01T19:41:14+5:302015-01-01T20:07:11+5:30

पेट्रोल व डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली असली तरी त्याचा बोजा ग्राहकांवर पडणार नसल्याचे धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले आहे.

Price of petrol and diesel by two rupees | पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात २ रुपयांनी वाढ

पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात २ रुपयांनी वाढ

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १ - पेट्रोल व डिझेलच्या उत्पादन शुल्कात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासूनच करवाढ लागू होणार आहे. दरम्यान उत्पादन शुल्कवाढीचा बोजा ग्राहकांवर पडणार नाही असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे.

Web Title: Price of petrol and diesel by two rupees