शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेलनंतर एलपीजी सिलेंडरचा भडका; विनाअनुदानित सिलेंडर 48 रुपयांनी महागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 10:06 IST

अनुदानित सिलेंडरच्या किमतीत 2 रुपये 34 पैशांची वाढ

मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता होरपळली असताना आता सिलेंडरच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. विनाअनुदानित सिलेंडरचा दर 2 रुपये 34 पैसे, तर अनुदानित सिलेंडरचा दर 48 रुपयांनी वधारला आहे. देशातील 81 टक्के कुटुंबं सिलेंडरचा वापर करतात. त्यामुळे या दरवाढीचा फटका कोट्यवधी लोकांना बसणार आहे. सिलेंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे आता अनुदानित सिलेंडरसाठी मुंबईत 491.31 रुपये मोजावे लागतील. तर दिल्लीत अनुदानित सिलेंडरची किंमत 493.55 रुपये इतकी होईल. याशिवाय अनुदानित सिलेंडरसाठी कोलकात्यात 496.65 रुपये, चेन्नईत 481.84 रुपये मोजावे लागतील. विनाअनुदानित सिलेंडरच्या दरांमध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे. मुंबईत विनाअनुदानित सिलेंडरसाठी 48.50 रुपये अधिक द्यावे लागतील. मुंबईत विनाअनुदानित सिलेंडर 671.50 रुपयांना मिळेल. तर विनाअनुदानित सिलेंडरसाठी दिल्लीत 698.50 रुपये, कोलकात्यात 723.50 रुपये, चेन्नईत 712.50 रुपये मोजण्याची तयारी ठेवावी लागेल.  सिलेंडरचे दर भडकले असताना पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये थोडीशी घट झाली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर सलग तिसऱ्या दिवशी कमी झाले आहेत. मात्र ही कपात फक्त 6 पैशांची आहे. सलग 16 दिवस इंधन दरांमध्ये वाढ पाहायला मिळाली होती. यानंतर बुधवारी इंधनाच्या दरात पहिल्यांदा कपात झाली. मात्र ती केवळ एका पैशाची होती. यानंतर गुरुवारी इंधनाचे दर 7 पैशांनी घटले. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर कमी झाल्यानं इंधन दरात घट पाहायला मिळतेय.  

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरMumbaiमुंबईdelhiदिल्लीChennaiचेन्नईPetrolपेट्रोलDieselडिझेल