निवडणूक साहित्याच्या किमतीत दुप्पट वाढ
By Admin | Updated: September 23, 2014 00:16 IST2014-09-23T00:16:27+5:302014-09-23T00:16:27+5:30
शहरातील प्रेस बाजारात लोकसभा निवडणुकी मुळे रात्र-दिवस प्रचार साहित्य बनविले जात असून ठाणे रायगडसह अन्य जिल्हात निवडणूक साहित्याला मागणी आहे.

निवडणूक साहित्याच्या किमतीत दुप्पट वाढ
सदानंद नाईक, उल्हासनगर
शहरातील प्रेस बाजारात लोकसभा निवडणुकी मुळे रात्र-दिवस प्रचार साहित्य बनविले जात असून ठाणे रायगडसह अन्य जिल्हात निवडणूक साहित्याला मागणी आहे. साहित्य किंमतीत दुप्पट वाढ होऊनही मागणीत सतत वाढ होत आहे.
निवडणुकीतील विविध साहित्याची निर्मित्ती येथील प्रेस बाजारात केली जात आहे. नोंदणीकृत पक्षाचे झेंडे, नावाच्या व चिन्हाच्या टोप्या, कलर हँडबिल, स्टीकर्स, अहवाल पुस्तिका, बॅचेस, मफलर, तोरण, डिजिटल बॅनर्स, पक्षाच्या नावाचे बलून आदी साहित्य तयार केले जात आहे. तसेच अपक्ष उमेदवाराचे चिन्हे, झेंडे, नावाच्या टोप्या, आदी साहित्य मागणी नुसार २४ तासाच्याआत बनवून दिले जात आहेत.
ठाणे जिल्हातील ठाणे, भिंवडी, कल्याण, पालघर, रायगड, मावळ, तसेच मुंबई येथिल लोकसभा उमेदवार येथील प्रेस बाजारातून निवडणूक साहित्य खरेदी करीत असल्याची माहिती प्रेस बाजारचे पदाधिकारी शंकर नागरानी व राजु तेलकर यांनी दिली आहे. साहित्याची मागणी हजारोच्या संख्येत व नगात असल्याने कमी किंमतीत साहित्य बनवून दिले जात आहे. तसेच किरकोळ स्वरूपात साहित्य खरेदी केल्यास १५ ते २० टक्के जादा किेंमत मोजावी लागत आहे. याशिवाय सर्च इंजिन सॉफटवेअर, मोबाईल सॉफटवेअर, अल्फाबेटीकल मतदार यादी, कॉम्युटरराईज्ड, कलर वोटर स्लिप, डमी वोटींग मशीन, यादी साहित्य मागणी नुसार बनविले जात आहे. प्रेस बाजारात ठाणे, रायगड व मुंबई येथील पक्ष उमेदवार पदाधिका-यांच्या मार्फत साहित्य बनवून घेत आहेत. अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्याचा राबता पुढील आठवडया पासून वाढणार असून प्रेस बाजारात कोट्यवधी रूपयाची उलाढाल होत आहे.