घटस्फोट टाळण्यासाठी थेट पंतप्रधान मोदींना साकडे
By Admin | Updated: December 26, 2016 11:51 IST2016-12-26T11:47:36+5:302016-12-26T11:51:28+5:30
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा पथकातील एका जवानाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून स्वत: संपवण्याची परवानगी मागितली आहे

घटस्फोट टाळण्यासाठी थेट पंतप्रधान मोदींना साकडे
ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 26 - केंद्रीय औद्योगिक सुरक्षा पथकातील एका जवानाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून स्वत: संपवण्याची परवानगी मागितली आहे. सत्येंद्र सिंह असे या जवानाचे नाव असून तो कांचीपूरम येथील अणूऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी तैनात आहे. सत्येंद्रला सुट्टया मिळत नसल्याने संतापून पत्नीने घटस्फोटाची धमकी दिली. त्यामुळे सत्येंद्रने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आत्महत्येची परवानगी मागणारे पत्र लिहीले.
मूळचे रांचीचे असणारे सत्येंद्र सिंह रविवारी सुट्टीवर आपल्या घरी आले. मे महिन्यात मी डयुटीवर रुजू झाल्यापासून मला रजा मिळाली नव्हती. रजेसाठी अर्ज करुनही सुट्टी मंजूर होत नव्हती.
डयुटीचा ताण इतका होता की, पत्नीलाही फोन करता येत नव्हता असे सत्येंद्रने सांगितले. पंतप्रधानांना लिहीलेल्या पत्रामध्ये सत्येंद्र यांनी वरिष्ठ आपला छळ करतात असा आरोपही केला.