पूर्ववैमनस्यातून दोघांना मारहाण
By Admin | Updated: April 20, 2015 13:12 IST2015-04-20T01:41:13+5:302015-04-20T13:12:34+5:30
अहमदनगर : जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाल्याने तिघांकडून मायलेकाला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना मंगलगेट (कोठला) भागात शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूर्ववैमनस्यातून दोघांना मारहाण
अहमदनगर : जुन्या भांडणाच्या कारणावरून वाद झाल्याने तिघांकडून मायलेकाला मारहाण करण्यात आली आहे. ही घटना मंगलगेट (कोठला) भागात शनिवारी दुपारी घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अनिता बाबुराव शिंदे (वय २५, रा. मंगलगेट, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. काशिम हाशिम शेख, फरजाना शेख, चुटका शेख यांनी जुन्या भांडणाचा राग आल्याने फिर्यादी शिंदे व त्यांचा मुलगा अशा दोघांना मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)