शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! कोरोना रुग्णांचे आकडे लपविण्यासाठी राज्यांचा दबाव; Thyrocare मालकाचा गंभीर आरोप

By हेमंत बावकर | Updated: October 29, 2020 18:28 IST

CoronaVirus News: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट झाली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार प्रत्येक दिवशीच्या कोरोना रुग्णांमध्ये 40 टक्के घट झाली आहे.

राज्य सरकारांची बदनामी होईल या भीतीने कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी लपविण्याचे कृत्य करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप थायरोकेअर (Thyrocare) ने केले आहेत. चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या आकडेवारीमध्ये हेराफेरी करण्यासाठी राज्य सरकारे दबाव आणत असल्याचा आरोप करत चाचण्या करण्यासही रोखले जात असल्याचे कंपनीचे सीईओ वेलुमनी यांनी केला आहे. 

Thyrocare Technologies चे सीईओ वेलुमनी यांनी सांगितले की, काही राज्यांनी थायरोकेअरला सांगितले आहे की, कोरोनाच्या चाचण्या घेऊ नका. तर काही राज्यांनी कोरोना रुग्णांचे आकडे आयसीएमआरला देऊ नयेत किंवा त्यामध्ये हेराफेरी करावी, असे सांगितले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट झाली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार प्रत्येक दिवशीच्या कोरोना रुग्णांमध्ये 40 टक्के घट झाली आहे. फाइनान्शिअल टाइम्सच्या वृत्तानुसार राज्य सरकारांनी कोरोनाची आकडेवारी कमी दाखविण्यासाठी चाचण्यांवर नियंत्रण ठेवले आहे. त्यांनी सांगितले की, अनेक राज्यांनी थायरोकेअरला सांगितले आहे की कोरोना चाचण्या करू नयेत. तर काही राज्यांनी आयसीएमआरला अहवाल देण्यास मनाई केली आहे. तर काहींनी आकडे बदलण्यास सांगितले आहे. आम्ही आकडे सांगू तशीच आकडेवारी देण्यास बजावले आहे. थायरोकेअरद्वरे दोन महिन्यांपूर्वी दरदिवशी 7000 टेस्ट केल्या जात होत्या. ही संख्या आता घटून 2500 वर आली आहे. 

दरम्यान, देशात कोरोना चाचण्यांची संख्या ही गेल्या महिनाभरात 9.4 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, याचवेळी गुजरात 15.2 टक्के, महाराष्ट्र 35.3, पंजाबमध्ये 15.3 टक्के आणि बिहारमध्ये 17.2 टक्के चाचण्यांच्या संख्येत घट झाली आहे. तर कर्नाटक 59.5 टक्के, केरळ 10.7 टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये 31.8 टक्के चाचण्यांमध्ये वाढ झाली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरात