आऱआऱ यांच्या निधनावर राष्ट्रपतींच्या शोकसंवेदना
By Admin | Updated: February 18, 2015 23:54 IST2015-02-18T23:54:13+5:302015-02-18T23:54:13+5:30
नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आऱआऱ पाटील यांच्या निधनावर बुधवारी तीव्र दु:ख व्यक्त केले़ आऱआऱ पाटील यांच्या रूपात देशाने एक तळागाळातील लोकांसाठी खपणारा लोकनेता गमावला असल्याचे त्यांनी म्हटले़

आऱआऱ यांच्या निधनावर राष्ट्रपतींच्या शोकसंवेदना
न ी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आऱआऱ पाटील यांच्या निधनावर बुधवारी तीव्र दु:ख व्यक्त केले़ आऱआऱ पाटील यांच्या रूपात देशाने एक तळागाळातील लोकांसाठी खपणारा लोकनेता गमावला असल्याचे त्यांनी म्हटले़आऱ आऱ यांच्या पत्नी सुमन आऱआऱ पाटील यांना राष्ट्रपतींनी शोकसंदेश पाठवला आहे़ आऱआऱ पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले़ महाराष्ट्राच्या विकासातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील़ देव, त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, अशी मी प्रार्थना करतो, असे राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे़