शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांची ने-आण करणारा पोलीस अधिकारी राष्ट्रपती पदक विजेता; लाखो रुपये उकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 19:17 IST

संसद हल्ल्यातही हात? अफजल गुरूने भर न्यायालयात सांगितले होते

श्रीनगर : श्रीनगर विमानतळावर स्ट्रॅटेजिक एंटी हायजॅकिंग टीममध्ये तैनात असलेला अधिकारी देविंदर सिंह याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हा पोलिस अधिकारी डीएसपी दर्जाचा असून राष्ट्रपतींकडून वीरता पुरस्कारही मिळालेला आहे. या अधिकाऱ्याला दहशतवाद्यांसह त्याच्या कारमध्ये पकडण्यात आल्याने त्याला दहशतवाद्यांसारखीच वागणूक देण्यात येणार आहे. 

11 जणांची हत्या करणारा दहशतवादी नवीद बाबा याच्यासोबत ताब्यात घेण्यात आलेल्या डीएसपी देविंदर सिंहचा वीरता पुरस्कार परत घेतला जाण्याची शक्यता आहे. याची माहिती गृह मंत्रालयाला देण्यात आली आहे. त्याची आयबी, रॉ आणि लष्काराकडून चौकशी केली जाणार आहे. यानंतर एनआयए सिंह आणि नवीद यांना ताब्यात घेणार आहे. 

देविंदरने दहशतवाद्यांना सुरक्षित स्थळी सोडण्यासाठी 12 लाख रुपयांची लाच घेतल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. देविंदर हा नवीद आणि आसिफ अहमद या दोन दहशतवाद्यांना चंदीगढला सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी नेत होता. जेव्हा त्याची कार थांबविण्यात आली तेव्हा त्याची कार इरफान अहमद मीर हा चालवत होता. त्यांना कुलगामच्या हायवेवर रोखण्यात आले होते. 

मीर हा पाचवेळा पाकिस्तानात जाऊन आलेला आहे. यामुळे हे दोघेही दहशतवाद्यांना हल्ला करण्यासाठी किंवा परत जाण्यासाठी मदत तर करत नव्हते ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यांच्याकडे एक एके 47 रायफल, दोन पिस्तूल आणि दोन ग्रेनेड जप्त सापडले आहेत. तसेच सिंहच्या घरातून लाखो रुपये जप्त करण्यात आले आहेत. 

चौकशीमध्ये असे आढळून आले आहे की, सिंह गेल्या काही वर्षांपासून दहशतवाद्यांना हिवाळ्यामध्ये सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम करत होता. यासाठी तो मोठी रक्कम घेत होता. सिंह नवीद आणि आसिफला घेण्यासाठी शोपिया जिल्ह्यामध्ये गेला होता, तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर होते. हे दहशतवादी सिंह याच्या श्रीनगर येथील घरातही एक रात्र थांबले होते. 

संसद हल्ल्यातही हात? अफजल गुरूने भर न्यायालयात सांगितले होतेसिंह याचे नाव याआधी संसद हल्ल्यातही घेतले गेलेले होते. संसद हल्ल्यातील आरोपी अफजल गुरूने न्यायालयात सांगितले होते की, सिंह यांच्या आदेशावरूनच दिल्लीला पाठविण्यात आले होते. यावेळी दहशतवाद्यांची राहण्याची सोयही त्यानेत केली होती. तसेच एखादी वापरलेली अँबेसिडर कारही खरेदी करण्यास सांगितले होते. याच कारचा वापर संसद हल्ल्यासाठी करण्यात आला होता. मात्र, तेव्हा पोलिसांनी हे आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. 

टॅग्स :ParliamentसंसदterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला