राष्ट्रपतीपदाची निवडणूक : गहलोत यांचे नाव आघाडीवर
By Admin | Updated: May 11, 2017 00:30 IST2017-05-11T00:30:05+5:302017-05-11T00:30:05+5:30
राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावर चंद गेहलोत यांचे नाव समोर आले आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक : गहलोत यांचे नाव आघाडीवर
हरीश गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावर चंद गेहलोत यांचे नाव समोर आले आहे.
गेहलोत हे मध्यप्रदेशातील वादग्रस्त नसलेले दलित नेते असून, ते पक्षभेदाच्या मर्यादा ओलांडून स्वीकारले जाऊ शकतात. दलितांपर्यंत पोहोचायच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारात गेहलोत अगदी योग्यरीत्या बसणारे आहेत, असे भाजपमधील उच्च पातळीवरील सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार ठरवताना ब्राह्मण आणि दलित हे एकीकरण अंतिमत: निर्णायक ठरणारे आहे. या दोन्ही पदांसाठी आपला उमेदवार निवडून यावाच असा प्रयत्न भाजप करील, हे स्पष्ट आहे.
ब्राह्मण उमेदवार राष्ट्रपती बनला तर दलिताकडे उपराष्ट्रपतीपद येईल. मोदी यांचा प्रयत्न राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची निवड एकमताने व्हावी असा आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी राष्ट्रपतीपदासाठी भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देऊ, असे जाहीर केले.