राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ‘वीरभूमी’वर गेलेच नाही
By Admin | Updated: May 21, 2015 23:45 IST2015-05-21T23:45:33+5:302015-05-21T23:45:33+5:30
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी देशभरात आदरांजली अर्पण करण्यात आली.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती ‘वीरभूमी’वर गेलेच नाही
राजीव गांधी समाधीस्थळ : देशाची आदरांजली
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी देशभरात आदरांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी वीरभूमी या राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाला भेट देण्याचे टाळणे चर्चेचा विषय ठरले आहे, अशा प्रकारच्या समारंभात सरकारचा सहभाग काढून घेण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यामुळे या मान्यवरांनी ही भेट टाळल्याचे मानले जाते.
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पुत्र राहुल गांधी, कन्या प्रियंका, जावई रॉबर्ट वडेरा यांनी वीरभूमीवर आदरांजली वाहिली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, पी.सी. चाको, आॅस्कर फर्नांडिस, गुलाम नबी आझाद, अजय माकन आदी काँग्रेस नेतेही त्यावेळी उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करीत असल्याचे टिष्ट्वट केले आहे. माझी राजीव गांधी यांना आदरांजली एवढेच त्यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. राजीव गांधी २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेरुम्बदूर येथे निवडणूक प्रचारावर असताना मानवी बॉम्बने त्यांची हत्या केली.