शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

महाराष्ट्रातील चार कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 18:13 IST

प्रसिद्ध नाट्य लेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबला वादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली : प्रसिद्ध नाट्य लेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबला वादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना आज राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर डॉ. संध्या पुरेचा यांना फेलोशीप प्रदान करण्यात आली.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉल मध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ४ कलाकारांसह देशभरातील ४२ कलाकारांना वर्ष २०१७ चे नाट्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री डॉ.महेश शर्मा यावेळी उपस्थित होते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर यांना सन्मानित करण्यात आले. श्री.भडकमकर यांनी गेली दोन दशके नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात अभिनेता व दिग्दर्शक म्हणून उत्तम कार्य केले आहे.

नाटक, सिनेमा, कथा कादंबरीच्या माध्यमातून उत्तम आणि दर्जेदार लेखक म्हणून सहजपणे वावरणारे श्री.भडकमकर उत्तम कलावंतही आहेत. ‘चुडैल’ हा कथासंग्रह, ‘असा हा बालगंधर्व’ ही बालगंधर्वांचा जीवनपट उलगडणारी कादंबरी आणि आजच्या मालिका विश्वाच्या पडद्यामागच्या वास्तवाचं दर्शन घडवणारी ‘एट एनी कॉस्ट’ ही कादंबरी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. दिल्लीतील राष्ट्रीय नाट्य विद्यालयात कलेचे धडे गिरवणारे श्री.भडकमकर यांनी अनेक मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. आई, ए रेनी डे, खबरदार, देवकी, पाऊलवाट, बालगंधर्व या चित्रपटांची पटकथाही त्यांनी लिहिली आहे. ‘आम्ही असू लाडके’ हा मराठी चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केला आहे. विविध नाटकेही त्यांनी लिहिली आहेत.

नाट्य दिग्दर्शनातील योगदानासाठी सुनील शानबाग यांना सन्मानित करण्यात आले. सुनील शानबाग यांची नाट्य दिग्दर्शक म्हणून ख्याती आहे. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्या सोबत त्यांनी 1974 ते 1984 अशी सलग दहा वर्षे 25 कलाकृतींमध्ये  कलाकार व सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली. श्री.शानबाग यांनी कला क्षेत्रातील मित्रांच्या सहकार्याने 1985 मध्ये ‘अपर्णा रिप्रेटरी कंपनीची’ स्थापना केली व या माध्यमातून वर्षाला 50 नाट्य प्रयोग होत असत. श्री.शानबाग यांनी विजय तेंडुलकर लिखीत ‘सायकल वाला’, महेश एलकुंचवार लिखीत ‘प्रतिबिंब’ आणि ‘शफत खान यांचे किस्से’, सयाजी शिंदे लिखीत ‘तुंबुरा’ आणि रामु रामनाथन यांच्या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.प्रसिद्ध तबलावादक पंडित योगेश सामसी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. श्री.सामसी यांनी पं. एच. तारंथनराव यांच्याकडून वयाच्या चौथ्यावर्षांपासून तबला वादनाचे धडे घेतले. यानंतर श्री.सामसी यांना सलग दोन दशके प्रसिद्ध तबला वादक उस्ताद अल्लारखाँ खान यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रसिद्ध गायक व नृत्यकालाकारांना श्री.सामसी यांनी तबल्याची साथ केली यात उस्ताद विलायत खाँ, पं. अजय चक्रवर्थी, पं. भिमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरसिया, पं.शिवकुमार शर्मा आदी दिग्गजांचा समावेश आहे.लोककलांचे अभ्यासक डॉ.प्रकाश खांडगे यांना लोककलेतील योगदानासाठी गौरविण्यात आले. लोककला अकादमी अंतर्गत शाहीर अमरशेख अध्यासनाचे प्रमुख असलेले डॉ.खांडगे १९७८ पासून संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी इंडियन नॅशनल थिएटर, लोककला संशोधन केंद्राचे ज्येष्ठ नाटककार अशोक परांजपे आणि ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाला सुरुवात केली. डॉ.खांडगे यांनी चीनमध्ये लोककला लोकसंगीत परिषदमध्ये चार वेळा प्रतिनिधित्व केले, तर सॅन होजे येथे विश्व मराठी साहित्य संमेलनातही त्यांनी व्याख्यान दिले. नॅशविलमध्ये अमेरिकन फोकलोअर सोसायटीमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय ते राज्य आणि केंद्राच्या विविध सांस्कृतिक समित्यांवर कार्यरत आहेत.  ‘प्रयोगात्मक लोककला’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे.  १ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १९५२ पासून संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

डॉ.संध्या पुरेचा यांना अकादमीची फेलोशीपललित कलेतील योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या डॉ.संध्या पुरेचा यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीची मानाची फेलोशिप बहाल करण्यात आली. प्रसिद्ध भरत नाट्यम् नृत्यांगणा असलेल्या डॉ.पुरेचा  या मुंबई स्थित कला परिचय संस्थेच्या संचालिका तसेच सरफोजीराजे भोसले भरत नाट्यम प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या सचिव आहेत. आचार्य पार्वती कुमार यांच्याकडून डॉ.पुरेचा यांनी भरत नाट्यमचे धडे घेतले. त्यांनी ‘नाट्य शास्त्र’ विषयावर संशोधनही केले आहे. ३ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षMaharashtraमहाराष्ट्र